Amitesh Kumar : 'पोलीस अधिकारी हे एका...'; हेल्मेट सक्तीविषयी पोलीस आयुक्त अमितेश कुमार नेमकं काय म्हणाले?

Amitesh Kumar News : पुण्यातील वाहतुकीचे नियम कडक करण्यात येत आहे. यादरम्यान पुण्यातील पोलिसांना हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. दुचाकीस्वार पोलिसांना ही हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे.
Amitesh Kumar
Amitesh Kumar Saam tv
Published On

नितीन पाटणकर, पुणे

Pune Latest News:

पुण्यातील वाहतुकीचे नियम कडक करण्यात येत आहे. यादरम्यान पुण्यातील पोलिसांना हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. दुचाकीस्वार पोलिसांना ही हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. पोलिसांना करण्यात आलेल्या हेल्मेट सक्तीविषयी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी माध्यमांशी संवाद साधला. पोलिसांच्या हेल्मेट सक्तीविषयी पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले,'पोलीस अधिकारी हे एका शिस्तबद्ध फोर्सचे सदस्य आहेत. त्यांच्याकडून सर्व कायद्यांचे आणि नियमाची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यांनी हेल्मेट वापरावं'.

Amitesh Kumar
Pune Accident News: पुण्यातील नवले पुलाजवळ भीषण अपघात; भरधाव डंपरने खासगी बसला उडवलं, थरारक घटना

पुणे शहरातील कायदा सुव्यवस्थेवर पोलीस आयुक्त म्हणाले,' पुण्यात गुन्ह्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यात आम्हाला यश येत आहे. सर्व गुन्हेगारांवर पोलिसांकडून कारवाई सुरू आहे. गुन्ह्यांवर नियंत्रण हीच पोलिसांची मुख्य जबाबदारी आहे'.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Amitesh Kumar
Nanded News: नांदेडमध्ये अवकाळी पावसाचा कहर; गारपिटीमुळे 17 हजार हेक्टरवर पिकांचे नुकसान, 22 हजार शेतकरी बाधित

निखिल वागळे हल्ला प्रकरणावर पोलीस आयुक्त काय म्हणाले?

निखिल वागळे हल्ला प्रकरणावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, 'निखिल वागळे यांनी एक विधान केलं होतं. त्याचवेळी त्यांना आम्ही योग्य सूचना दिल्या होत्या. आम्ही तो कार्यक्रम पुढे ढकलण्याची विनंती केली होती. त्यांना आंदोलनाची पूर्ण कल्पना दिली होती. पण त्यांनी पोलिसांच ऐकलं नाही आणि ते स्वतःहून बाहेर पडले. यावेळी ज्यांनी चुकीची घटना केली, त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात येईल. आम्ही सर्व जणांवर योग्य ती कलम लावली आहेत. आतापर्यंत तपासात कुठेही 307 कलम लावण्यात यावा असं काही समोर आलं नाही'.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com