Bhandara News : तुमसर बाजार समितीची निवडणूकीस (tumsar bazar samiti election stay) नागपूर उच्च न्यायालयाने (nagpur high court) स्थगितीचे आदेश दिले आहेत. या बाजार समितीच्या निवडणूकीच्या अनुषगांने नागपूर उच्च न्यायालयाच्या खंडपीठीत याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर न्यायालयाने निर्णय दिला आहे. (Maharashtra News)
तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक (bajar samiti election) प्रक्रियेअंतर्गत 27 मार्चपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले आहेत. यासाठी साेमवार (ता. 3 एप्रिल) अखेरचा दिवस हाेता. दरम्यान भंडारा जिल्हाच्या मोहाडी तालुक्यातील 58 ग्रामपंचायतीच्या निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सरपंच व सदस्यांना प्रतिनिधीत्व नसल्याच्या मुद्यावरून त्यावर न्यायालया याचिका दाखल हाेती.
हरदोली येथील माजी सरपंच सदाशिव ढेंगे यांनी ही याचिका दाखल केली होती. त्यांच्या प्रयत्नाला यश आले आहे. (सोमवारी) याचिकेवर सुनावणी झाली असता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुमसर आणि मोहाडी या तहसीलमधील मतदारांचा समावेश आहे, सद्या 17 नोव्हेंबर 2022 पासून नियुक्त असलेले प्रशासकच बाजार समितीचा कारभार पाहत आहेत 1963 च्या अधिनियमाच्या कलम 13 (1) च्या तरतुदींनुसार बाजार समितीने इतर सदस्यांसह ग्रामपंचायत सदस्यांनी निवडलेले चार सदस्य असणे आवश्यक आहे.
तुमसर आणि मोहाडी तालुक्याचा समावेश असलेल्या बाजार परिसरात अनुक्रमे 97 आणि 74 ग्रामपंचायती आहेत. त्यातील 75 पैकी 58 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांना राज्य निवडणूक आयोगाने 23 नोव्हेंबर 2012 रोजी स्थगिती दिली आहे.
आजपर्यंत या निवडणुका झालेल्या नाहीत, परिणामत: मोहाडी तहसीलमधील पन्नास टक्क्यांहून अधिक ग्रामपंचायतींना बाजार समितीत (bazar samiti election latest marathi news) प्रतिनिधित्व मिळण्यापासून वंचित राहावे लागणार होते. हा मुद्दा उपस्थित करुन याचिकाकर्ते माजी सरपंच सदाशिव ढेंगे यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे रिट याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने तुमसर बाजार समिती निवडणूक प्रक्रियेला स्थगिती दिली आहे अशी माहिती सदाशिव ढेंगे यांनी दिली.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.