Doctor Saam tv
महाराष्ट्र

स्वप्न अधुरंच! डॉक्टरची गळफास घेऊन आत्महत्या, नागपूरमधील हॉटेलमध्ये आढळला मृतदेह

Nagpur Doctor Suicide: नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 26 वर्षीय निवासी डॉक्टर रुत्वीक ठाकूर यांचा हॉटेलमध्ये मृतदेह आढळला. आत्महत्येच्या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून गणेशपेठ पोलीस तपास करत आहेत.

Namdeo Kumbhar

पराग ढोबळे, नागपूर प्रतिनिधी

डॉक्टरच्या आत्महत्येने उपराजधानी नागपूर हादरलेय. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील (GMC) एका निवासी डॉक्टरने हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रुत्वीक सागर ठाकूर (वय २६) असे या मृत डॉक्टरचे नाव आहे. रुत्वीकच्या आत्महत्येच्या घटनेमुळे नागपूरमधील वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

नागपूरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नेत्ररोग विभागातील (Ophthalmology) २६ वर्षीय निवासी डॉक्टर रुत्वीक सागर ठाकूर (वय २६, रा. बुलढाणा) यांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. नागपूरमधील गणेशपेठ बसस्थानकाजवळील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन रुत्वीकने आयुष्याचा दोर कापला. मूळचा बुलढाणा येथील रहिवासी असलेला रुत्वीक ठाकूर हा हुशार विद्यार्थी होता. त्याच्या अकाली जाण्याने ठाकूर कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळलाय.

बुलढाण्याच्या रुत्वीकने नुकताच नागपूर मेडिकलमध्ये नेत्ररोग विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता. २७ जानेवारी २०२६ रोजी कॉलेजमध्ये रुजू झाला होता. ते विभागप्रमुख डॉ. दिलीप उमरे यांच्या युनिटमध्ये कार्यरत होते. पण काही दिवसांपासून तो गैरहजर होता. त्यामुळे त्याचा हॉटेलमध्ये तपास केला असता घटना उघडकीस आली. रुत्वीक याने आत्महत्या का केली? याचं कारण अद्याप अस्पष्टच आहे. गणेशपेठ पोलिसांकडून तपास करीत आहेत.

वैद्यकीय क्षेत्रात करिअर घडवण्याचे स्वप्न घेऊन नागपुरात आलेल्या रुत्वीकने अवघ्या ७ ते ८ दिवसांतच टोकाचे पाऊल का उचलले? याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. घटनास्थळी कोणतीही 'सुसाईड नोट' सापडली आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. गणेशपेठ पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney Health Tips : जीमनंतर प्रोटीन पावडर खाल्ल्याने किडनीवर होऊ शकतो परिणाम, वेळेआधीच जाणून घ्या 'या' ६ गोष्टी नाहीतर....

Maharashtra News Live Update : चंद्रपुरात शिवसेनेची ताकद वाढवण्याचा निर्धार; उदय सामंतांच्या उपस्थितीत आढावा बैठक

Ind vs SL : भारत विरुद्ध श्रीलंका पहिल्या कसोटीसाठी संघाची घोषणा, या खेळाडूंना मिळाली संधी

Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन १५ ऑगस्टला धावणार, रेल्वेमंत्र्यांनी दिली महत्त्वाची अपडेट

Face Care: फक्त ३ दिवसांत स्किन होईल सॉफ्ट आणि ग्लोईंग; आजच ट्राय करा 'हा' घरगुती फेसपॅक

SCROLL FOR NEXT