NAGPUR-GOA SHAKTIPEETH HIGHWAY saam tv
महाराष्ट्र

नागपूर ते गोवा प्रवास सुपरफास्ट! 8 तासांत पोहोचणार समुद्राच्या किनारी; 13 जिल्ह्यातून जाणार महामार्ग

Nagpur Goa Shaktipeeth Highway Route And District List: नागपूर ते गोवा प्रवासाचा वेळ कमी करण्याच्या उद्देशाने शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाला गती देण्यात येत आहे. 856.765 किमी लांबीचा हा प्रस्तावित महामार्ग महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यांना जोडणार असून, भूसंपादन आणि सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरू आहे.

Omkar Sonawane

नागपूर ते गोवा प्रवास आता अवघ्या 8 तासांत पूर्ण करता येणार आहे. नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या कामाला वेग आला असून, या महामार्गामुळे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील प्रवास अधिक जलद होण्याची अपेक्षा आहे. तब्बल 856.765 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यांतून जाणार आहे. या प्रकल्पासाठी आतापर्यंत 144 गावांमधील संयुक्त मोजणी सर्वेक्षण पूर्ण झाले असून, आणखी 265 गावांमध्ये सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. या महामार्गामुळे नागपूर, यवतमाळ, सोलापूर आणि कोल्हापूरसह अनेक शहरांची गोव्याशी थेट कनेक्टिव्हिटी मजबूत होणार आहे. सध्या नागपूर ते गोवा प्रवासासाठी सुमारे 18 तास लागतात. मात्र, शक्तिपीठ महामार्ग पूर्ण झाल्यानंतर हा प्रवास 8 तासांत पूर्ण होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

महाराष्ट्रात शक्तिपीठ महामार्गाच्या सर्वेक्षणाला वेग

नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पासाठी महाराष्ट्रात जमीन मोजणी आणि सर्वेक्षणाचे काम वेगाने सुरू आहे. सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये नव्याने संयुक्त मोजणी सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत 144 गावांतील सर्वेक्षण पूर्ण झाले असून, उर्वरित गावांमध्ये प्रक्रिया सुरू आहे. याआधी वर्धा आणि यवतमाळसारख्या विदर्भातील जिल्ह्यांमध्येही सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. राज्य सरकारने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी भूसंपादन पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. डिसेंबर 2027 पर्यंत भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आणि जानेवारी 2028 पासून प्रत्यक्ष बांधकाम सुरू करण्याचे नियोजन आहे. मात्र, प्रत्यक्ष काम सुरू होण्याची तारीख प्रशासकीय प्रक्रिया आणि आवश्यक मंजुरींवर अवलंबून असेल.

शक्तिपीठ महामार्ग कोणत्या जिल्ह्यांतून जाणार?

नागपूर ते गोवा हा शक्तिपीठ महामार्ग महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यांतून जाणार आहे. या प्रकल्पासाठी 40 तालुक्यांमधील 409 गावांतील सुमारे 8,760 हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे.

प्रत्येक शहरातून किती किमीपर्यंत असणार हा महामार्ग

वर्धा - 35 किलोमीटर

यवतमाळ -137 किलोमीटर

नांदेड - 20 किलोमीटर

हिंगोली - 70 किलोमीटर

परभणी - 60 किलोमीटर

बीड - 39 किलोमीटर

लातूर - 43 किलोमीटर

धाराशिव - 40 किलोमीटर

सोलापूर - 130 किलोमीटर

सातारा - 49 किलोमीटर

सांगली - 72 किलोमीटर

कोल्हापूर - 125 किलोमीटर

सिंधुदुर्ग - 36 किलोमीटर

या महामार्गाचा सर्वाधिक भाग यवतमाळ, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांतून जाणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यांतील वाहतूक आणि दळणवळण व्यवस्थेला फायदा होणार आहे.

नागपूर ते गोवा प्रवास 18 तासांऐवजी 8 तासांत?

सध्या नागपूर ते गोवा हे सुमारे 840 किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी प्रवासाला साधारण 18 तास लागू शकतात. शक्तिपीठ महामार्ग पूर्ण झाल्यानंतर हा प्रवास अवघ्या 8 तासांत पूर्ण होण्याचा अंदाज आहे.

2028 पासून बांधकाम सुरू होण्याची शक्यता

शक्तिपीठ महामार्गासाठी सध्या सर्वेक्षण, जमीन मोजणी आणि भूसंपादनाशी संबंधित प्रक्रिया सुरू आहे. उर्वरित गावांमधील सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर भूसंपादनाच्या कामाला पुढील गती मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच पर्यावरणविषयक आवश्यक मंजुरी मिळवण्याची प्रक्रियाही सुरू आहे. नियोजनानुसार, डिसेंबर 2027 पर्यंत भूसंपादन पूर्ण करून जानेवारी 2028 पासून प्रत्यक्ष बांधकाम सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cleaning Tips : नळांवर पांढरे डाग पडतायेत? या ट्रिक्स करा फॉलो, नळ दिसतील नवेकोरे

Mumbai : तारीख पे तारीख...११२ वर्षांचा इतिहास असलेल्या सायन रेल्वे पूल पुनर्बांधणीनंतर वाहतुकीस खुला कधी होणार?

Maharashtra News Live Update: शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये द्या, अन्यथा राज्यात पुन्हा आंदोलन! रोहित पवारांचा सरकारला इशारा

अभिजीत दिपकेंना कुठे नेलं? पोलिसांवर अपहरण केल्याचा आरोप, CJP आंदोलक आक्रमक

PM Kisan Yojana : खुशखबर! दसरा-दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ₹२,००० येणार, महत्त्वाची अपडेट समोर

SCROLL FOR NEXT