Toll Collection : टोल प्लाझावरील वाहनांच्या लांबच लांब रांगा होणार कमी? केंद्र सरकारकडून फास्टॅगनंतर नवीन MLFF प्रणाली सुरू

MLFF Toll System Update : टोल प्लाझावरील लांबच लांब रांगा होणार कमी? केंद्र सरकारकडून फास्टॅगनंतर मल्टी लेन फ्री फ्लो (MLFF) ही नवीन टोल वसुली प्रणाली सुरू होणार.

टोल प्लाझावरील वाहनांच्या लांबच लांब रांगा आता लवकरच कमी होण्याची शक्यता आहे. कारण केंद्र सरकारने टोल वसुलीच्या पद्धतीत मोठा बदल करण्यास सुरुवात केली आहे. फास्टॅगनंतर आता टोल वसुलीसाठी मल्टी लेन फ्री फ्लो (MLFF) ही नवीन स्वयंचलित प्रणाली आणण्यात आली आहे. या नवीन प्रणालीमुळे वाहनचालकांना टोल भरण्यासाठी टोल प्लाझावर थांबण्याची गरज पडणार नाही. तसेच टोल प्लाझाजवळ वाहनांचा वेग कमी करण्याचीही आवश्यकता राहणार नाही. त्यामुळे प्रवासाचा वेळ वाचण्यास मदत होणार आहे.

मल्टी लेन फ्री फ्लो प्रणालीमध्ये महामार्गावर बसवण्यात आलेले विशेष कॅमेरे आणि सेन्सर वाहनांची ओळख पटवतात. वाहनाच्या नंबर प्लेटच्या आधारे त्याची माहिती घेतली जाते. त्यानंतर संबंधित वाहनाच्या टोलची रक्कम आपोआप वजा केली जाते. त्यामुळे टोल भरण्यासाठी रांगेत उभे राहण्याची गरज राहत नाही. सध्या देशातील 7 टोल प्लाझावर ही प्रणाली प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे. या प्रयोगाला मिळणारा प्रतिसाद पाहून भविष्यात देशातील इतर टोल प्लाझावरही ही व्यवस्था सुरू केली जाऊ शकते. ही प्रणाली पूर्णपणे लागू झाल्यास महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.