Nagpur Crime News young businessman ends her life in kamthi area  
महाराष्ट्र

Nagpur Crime News: रात्री उशीरापर्यंत IPL फायनल बघितली; नंतर तरुणाने स्वत:च्या डोक्यात गोळी घातली, खळबळजनक घटना

Nagpur Latest News: सोमवारी रात्री उशीरापर्यंत आयपीएलची मॅच बघितल्यानंतर एका व्यावसायिक तरुणाने स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आपली जीवनयात्रा संपवली.

साम टिव्ही ब्युरो

Nagpur News Today: महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सोमवारी रात्री उशीरापर्यंत आयपीएलची मॅच बघितल्यानंतर एका व्यावसायिक तरुणाने स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आपली जीवनयात्रा संपवली. (Latest Marathi News)

नागपुरातील कामठी परिसरात ही धक्कादायक घटना घडली. आयुष अजय त्रिवेदी (२६, ऑरेंज सीटी, राजा रॉयलजवळ, नवीन कामठी) असे मृत तरुणाचे नावे आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली असून उलटसूलट चर्चांना उधाण आलं आहे.

प्राथामिक माहितीनुसार, आयुष त्रिवेदी हा सावनेर-कामठी (Nagpur News) परिसरात बांधकाम साहित्य पुरवठा करण्याचे काम करीत होता. याशिवाय तो रेती व्यवसायात देखील सक्रिय होता. आयुषकडे काही ट्रक आणि पोकलँड अशी वाहनेही आहेत.

गेल्या काही दिवसांपासून आयुष कर्जबाजारीपणामुळे तणावात राहत होता. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, आयुषने सोमवारी रात्री उशीरापर्यंत आयपीएल 2023 ची फायनल मॅच बघितली. मंगळवारी सकाळी चहा-नाश्त्याची वेळ होऊनही तो रुममधून बाहेर आला नाही.

त्याच्या खोलीचा दरवाजा आतून दार बंद असल्याने कुटुंबियांनी त्याला फोन केले. मात्र प्रतिसाद आला नाही. म्हणून आईने त्याच्या खोलीत डोकावून बघितला असता तो बेडवर रक्ताच्या थारोळ्यात (Crime News) पडून दिसला. कुटुंबियांनी आरडाओरड केल्याने शेजारची मंडळी धावली.

त्यांनी लगेच पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर कामठी पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. आयुषच्या रूमची बारकाईने तपासणी केल्यानंतर पोलिसांना पिस्तुल तसेच मोबाईलफोन मिळून आला. प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी आयुषने कर्जबाजारूपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची नोंद केली. (Breaking Marathi News)

सूत्रांच्या माहितीनुसार, आयुषला क्रिकेट सट्ट्याचे व्यसन होते. सोमवारी रात्री झालेल्या फायनल सामन्यात तो लाखो रुपये हरला. त्यामुळे लगवाडीची रोकड कुठून द्यायची, बुकींना कसे सामोरे जायचे, असे त्याच्यावर दडपण आले. त्यातूनच त्याने आत्महत्या केली असल्याची चर्चा आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar: मागच्या आणि आताच्या अजित पवारांमध्ये खूप फरक; उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवला धक्का, ICC ने सूर्यावर केली मोठी कारवाई

Maharashtra Live News Update: सोशल मीडियावर महिलेची अश्लील छायाचित्र आणि प्रोफाइल बनवणाऱ्या तरुणाला अटक

युजरच्या 'स्कीम'ची जोरदार चर्चा! 'फॉलो करा अन् मिळवा 1GB, 2GB इंटरनेट पॅक', पठ्ठ्याचे अवघ्या ४ महिन्यातच वाढले 15000 फॉलोवर्स

जिथं दहशत तिथंच धिंड, पुण्यात आरोपींना आणलं गुडघ्यावर|VIDEO

SCROLL FOR NEXT