Lonavala Car Accident: माझ्या नवऱ्याची कार दरीत कोसळलीये... लोणावळा पोलिसांना आलेल्या कॉलमुळे मोठा अनर्थ टळला

Car Accident In Lonavala: सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या फोनवर मुंबई येथून एका महिलेचा फोन आला.
Lonavala Car Accident
Lonavala Car Accidentsaam tv
Published On

>>दिलीप कांबळे, साम टीव्ही

Lonavala Accident News: लोणावळ्यातील टायगर पॉईट परिसरातील घुबड तलावासमोरील दरीत एक कार दरीत कोसळली. लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या प्रसंगावधनामुळे त्या कारमधील इसमाचा जीव वाचविण्यात यश आले आहे. आज सायंकाळी पाच वाजण्याची सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे.

पाच वाजण्याच्या सुमारास लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या फोनवर मुंबई येथून एका महिलेचा फोन आला. या महिलेने तिचे पती हे टायगर पॉईंट परिसरात फिरायला गेले असताना गाडीसह खोल दरीत कोसळल्याची माहिती दिली. ही माहिती समजताच लोणावळा पोलीसांनी तात्काळ टायगर पॉईंट परिसरात धाव घेतली.

Lonavala Car Accident
Mumbai Crime: बायकोला भेटायला निघालेल्या पतीचा प्रियकराने वाटेतच काढला काटा! पोलीसांसमोर धक्कादायक कबुली

टायगर पॉईंट परिसरातील स्थानिक दुकानदारांच्या मदतीने पोलिसांनी दरीत पडलेल्या गाडीचा शोध सुरू केला. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास लोणावळा येथील टायगर पॉईंट परिसरातील घुबड तलावाजवळ असलेल्या अंदाजे 60 ते 65 फूट खोल दरीत एक गाडी पडलेली त्यांना दिसली.

पोलीस उपनिरीक्षक भोसले यांनी तात्काळ स्वतः दरीत उतरून दरीत पडलेल्या गाडीतील इस्मास बाहेर काढले. ही व्यक्ती गंभीर जखमी झाली होती त्यामुळे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना टायगर पॉईंट येथील दुकानदारांच्या मदतीने पाठीवर उचलून दरीतून वर काढले आणि पुढील उपचारासाठी लोणावळा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. (Crime News)

Lonavala Car Accident
Udayanraje Bhosale Drive Bullet: शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त निघालेल्या दुचाकी रॅलीत उदयनराजे भोसलेंची स्टाईलमध्ये बुलेटस्वारी!

पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून दरीत उतरून जखमीस वेळीच गाडीतून बाहेर काडल्याने त्याचे प्राण वाचले. सदर जखमी व्यक्तीचं नाव गौरव ठक्कर असे असून तो मुंबई येथील राहिवाशी आहे. सध्या ठक्कर यांची त्याची प्रकृती स्थीर आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com