Nagpur News:  Saamtv
महाराष्ट्र

Nagpur News: नसतं धाडस जीवावर बेतलं! स्टंटबाजी करायला गेला अन् घडलं भयंकर; तरुणाचा बुडून मृत्यू, थरकाप उडवणारा VIDEO

Nagpur Viral News; Death of a Young Man by Drowning: तीन तरुण अचानक ज्या सांडव्यावरून तलावाचा पाणी समोरच्या दिशेने वाहते त्या सांडव्याच्या भिंतीवर चढण्याचा प्रयत्न करू लागले. एक तरुण त्यात यशस्वी झाला, मात्र दोघे सांडव्यावरून खाली घसरले.

Gangappa Pujari

पराग ढोबळे, ता. १६ ऑगस्ट २०२४

तलावाच्या सांडव्यावर उभे राहून स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचा तलावात कोसळून नंतर बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. नागपूर जिल्ह्याच्या उमरेड शहराजवळ घडलेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुरूवारी (१५, ऑगस्ट) स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने नागपूर जिल्ह्याच्या उमरेड शहराजवळ असलेल्या मकरधोकडा तलावावर पर्यटकांची मोठी गर्दी होती. त्यामध्ये तरुणांची संख्या लक्षणीय होती. यावेळी तलावावर काही तरुण हुल्लडबाजी करत होते. अशातच तीन तरुण अचानक ज्या सांडव्यावरून तलावाचा पाणी समोरच्या दिशेने वाहते त्या सांडव्याच्या भिंतीवर चढण्याचा प्रयत्न करू लागले.

एक तरुण त्यात यशस्वी झाला, मात्र दोघे सांडव्यावरून खाली घसरले. जो तरुण सांडव्याच्या भिंतीवर उभा राहिला होता, तो नंतर उलट्या दिशेने तलावात कोसळला. या दुर्घटनेत पोहता येत नसल्यामुळे तलाव्यात पडलेल्या मुलाचा मृत्यू झाला.

दरम्यान, या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये तीन तरुण जीव धोक्यात घालून सांडव्याच्या भिंतीवर चढताना दिसत आहेत. याचवेळी पाय घसरुन तरुण पडतो अन् त्यातच जीव जातो. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून पर्यटनस्थळी काळजी घेण्याचे, धोकादायक स्टंटबाजी न करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे बंधू एकत्र येताच नितेश राणेंचा टोला, नवरा कोण आणि नवरी कोण?|VIDEO

Maharashtra Live News Update: शक्तीपीठ महामार्गामुळे राधानगरी ,करवीर आणि पन्हाळा तालुक्यातील गावांना बसणार फटका

Hair Care Tips: झोपताना केस बांधावे की मोकळे ठेवावे, काय फायदेशीर?

Sweet Corn Dosa Recipe : पावसाळ्यात संध्याकाळचा नाश्ता होईल खास, १० मिनिटांत बनवा चटपटीत 'स्वीट कॉर्न डोसा'

Accident: भीषण अपघात! अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या बसचा ब्रेक फेल, ४ वाहनांना धडक; ३६ प्रवासी गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT