पराग ढोबळे, नागपूर|ता. ३ जुलै २०२४
नागपुरमधील हिट अँड रन केस प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. अनेक महिने फरार असलेल्या आरोपी रितिका मालूची काल न्यायदंडाधिकारी न्यायालयाने सुटका केली आहे. पोलिसांनी तांत्रिक बाबी न पाळल्याने न्यायालयाने तिची अटकच बेकायदेशीर ठरवत ताशेरे ओढले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, 24 फेब्रुवारी 2024 च्या रात्री नागपूर शहरामध्ये हिट अँड रनची घटना समोर आली होती. मध्यरात्री क्लबमधून घरी जात असताना भरधाव मर्सिडिज कारने दोन तरुणांना चिरडले होते. या दुर्घटनेत हुसेन गुलाम मुस्तफा आणि मोहम्मद अतिक या दोन्ही तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
याप्रकरणी कारचालक महिला रितिका मालूवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र हा अपघात झाल्यापासून रितिका मालू फरार होती. पोलिसांकडून तिचा शोध सुरू होता. दोन दिवसांपूर्वी म्हणजेच १ जुलै रोजी आरोपी रितिका मालूने आत्मसमर्पन केले होते. त्यानंतर काल तिची न्यायालयाने सुटकाही केली.
पोलिसांनी तांत्रिक बाबी न पाळल्याने न्यायालयाने तिची अटकच बेकायदेशीर ठरवत ताशेरे ओढले. तसेच या प्रकरणात कलमवाढ करण्या अगोदर पोलिसांनी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाची परवानगी घेतली नव्हती. या कारणामुळे रितिका मालूची प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने सुटका केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.