Indigo Flight 
महाराष्ट्र

Nagpur Airport: टेक ऑफपूर्वीच पायलटचा मृत्यू, नागपूर एअरपोर्टवरील घटना; नेमकं काय घडलं?

Nagpur Pilot Dies Before Take Off: हे इंडिगो कंपनीचे विमान असून नागपूरवरुन पुण्याच्या दिशेने जाणार होते.

Priya More

Nagpur News: नागपूर एअरपोर्टवर (Nagpur Airport) एक धक्कादायक घटना घडली आहे. एअरपोर्टवर विमान टेकऑफ करण्यापूर्वी पायलटचा मृत्यू (pilot dies before take off) झाला आहे. या पायलटचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. हे इंडिगो कंपनीचे विमान असून नागपूरवरुन पुण्याच्या दिशेने जाणार होते. पण विमान टेकऑफ करण्यापूर्वीच ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगो एअरलाइन्सचे नागपूरवरुन पुण्याला प्रवाशांना घेऊन जाणारे विमान काही वेळातच टेकऑफ करणार होते. पण टेकऑफपूर्वी विमानाचे टेकऑफ करणाऱ्या पायलटचा दुर्दैवी मृत्यू झाला. पायलट विमानात बोर्ड होण्यापूर्वीच बोर्डिंग गेटजवळ खाली कोसळले. त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला.

कॅप्टन मनोज सुब्रम्हण्यम (४० वर्षे) असं या पालटचे नाव आहे. मनोज हे खाली कोसळल्यानंतर एअरपोर्टवरील ग्राऊंड स्फाफने त्यांना तात्काळ उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पण उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. या घटनेमुळे नागपूर एअरपोर्टवर काही काळ गोंधळाचे वातावरण होते.

मनोज सुब्रम्हण्यम यांच्या मृत्यूचे प्राथमिक कारण कार्डियाक अरेस्ट असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम केल्यानंतर खरं कारण समोर येईल. इंडिगो कंपनीने या घटनेनंतर निवेदन जारी केले. यामध्ये त्यांनी असे सांगितले की,'आज नागपूरमध्ये आमच्या एका पायलटचे निधन झाल्याने दुःख झाले. नागपूर एअरपोर्टवर अचानक त्यांची तब्येत बिघडली. उपचारासाठी त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पण तिथे त्यांचे दुर्दैवी निधन झाले.'

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: सरकारी नोकरी, लंच ब्रेकमध्ये अभ्यास, तिसऱ्या प्रयत्नात UPSC त पहिला; IAS प्रदीप सिंह यांची सक्सेस स्टोरी

Maharashtra Rail Update: केंद्राचा महाराष्ट्राला गीफ्ट, दोन रेल्वे प्रकल्पांना मंजूरी, शेतकऱ्यांना होणार फायदा

Viral Video: कसं काय पुणेकर! पारा तब्बल १० अंशावर अन् धुक्के; गुलाबी थंडीचा VIDEO पाहाच

Bhiwandi : भिवंडी गूढ धक्क्यांनी हादरली, भूकंप की आणखी काही, शहरात खळबळ

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून मिळणार? तारीख काय? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT