Car Accident Saam tv
महाराष्ट्र

Car Accident : भीषण अपघात; अनियंत्रण कार ४० फुटावरून नदीत कोसळली, तरुणाचा जागीच मृत्यू

Nagpur News : वडिलांच्या मृत्यूनंतर दोघे भाऊ हे हॉटेल व्यवसाय सांभाळत होते. सागर याने चार महिन्यांपूर्वीच नवीन कार घेतली होती. हि कार घेऊन निघालेल्या सागरचा अपघातात मृत्यू झाला आहे

Rajesh Sonwane

पराग ढोबळे 
नागपूर
: चार महिन्यांपूर्वी घेतलेल्या कारची हौस पूर्ण झाली नसताना भीषण दुर्घटना घडली आहे. कार घेऊन निघालेल्या तरुणाचे कार चालविताना नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात भरधाव कार थेट मरु नदीच्या पुलावरून ३५ ते ४० फूट उंच पुलावरून थेट नदीत कोसळली. यामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली आहे. 

नागपूरच्या भिवापूरात सकाळी आठ वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात घडला आहे. यात सागर वाघमारे असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. नीरजकडून उमरेडच्या दिशेने जात असताना वळण रस्त्यावर सागरचे कारवरील नियंत्रण सुटले. वळण रस्ता असल्याने कार अगदी भरधाव वेगाने येऊन नदीला कोसळली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

चार महिन्यापूर्वीच घेतली होती कार 
सदर अपघातात सागर वाघमारे या तरुणाचा मृत्यू झाला आहे. सागर वाघमारे हा हॉटेल व्यवसायिक होता. वडिलांच्या मृत्यूनंतर दोघे भाऊ हे हॉटेल व्यवसाय सांभाळत होते. सागर याने चार महिन्यांपूर्वीच नवीन कार घेतली होती. हि कार घेऊन निघालेल्या सागरचा अपघातात मृत्यू झाला आहे. अंगाचा थरकाप उडविणाऱ्या या अपघातात नदीपात्रात पाणी असल्याने कार पाण्यात बुडाली होती. यामुळे सागरला बाहेर निघता न आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. 

स्थानिकांच्या मदतीने कार काढली बाहेर 

दरम्यान अपघात झाल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. घटनेची माहिती पोलिसांना देखील देण्यात आली. यानंतर पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने कार नदीपात्रातून बाहेर काढण्यात आली. यात सागरचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांकडून दिली जात आहे. मृतदेहाचा शवविच्छेदन केल जाणार आहे. यात कार भरधाव असल्यानं अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri News : कोकणात मोठी दुर्घटना! गणपतीपुळे समुद्रात संभाजीनगरचे ८ जण बुडाले

Maharashtra News Live Update: परभणी शहरातील विविध भागात ATS पथकांची धाड

सोलापूर हादरले! प्रपोज नाकारल्याचा राग, महिलेच्या लग्नानंतर अवघ्या २ महिन्यांत पतीचा खून, कोयत्याने सपासप वार

Gold Rate Today : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 24K, 22K, 18K सोन्याचे दर वाढले, पाहा आजचे भाव

Diabetes Recipe : मधुमेहाच्या रुग्णांनी 'ही' चटपटीत चटणी एकदा खाऊन तर पाहा, चवीला भारी अन् आरोग्याला फायदेशीर

SCROLL FOR NEXT