Nagpur Accident News  Saam Tv News
महाराष्ट्र

Nagpur Accident : टेम्पोनं टर्न घेतला, भरधाव दुचाकीची धडक, केटरिंगच्या कामाहून परतताना दोघांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO

Nagpur Accident News : नितीन राजेंद्र कटरे (वय १८)आणि आणि कोमल भगवती यादव (वय १७) अशी मृत्तकांची नावं आहेत. हे दोघेही चांगले मित्र मैत्रिणी होते. दोघेही केटरिंगच्या कामासाठी गेले होते.

Prashant Patil

नागपूर : राज्यात अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. असाच एक भीषण अपघात नागपूरमध्ये झाला आहे. मध्यरात्री केटरिंगच्या कामावरुन परतत असताना एका टेम्पो वाहनाला भरधाव दुचाकीची धडक बसली आणि यात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एक तरुणी आणि एका तरुणाचा समावेश आहे. या अपघाताचा थरारक सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे. गुरुवारी मध्यरात्री १२.४३ मिनिटांनी ही घटना अजनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत मानेवाडा मार्गावर घडली.

नितीन राजेंद्र कटरे (वय १८)आणि आणि कोमल भगवती यादव (वय १७) अशी मृत्तकांची नावं आहेत. हे दोघेही चांगले मित्र मैत्रिणी होते. दोघेही केटरिंगच्या कामासाठी गेले होते. मध्यरात्री घरी परतत असताना काळाने घाला घातला आणि हा भीषण अपघात झाला. मानेवाडा मार्गावर समोरून येणारा टेम्पो हा राईट टर्न घेऊन जात रस्ता ओलांडत असताना, दोघेही भरधाव दुचाकीवरून टेम्पोला धडकले. टेम्पोचालक हा घटनास्थळावरून निघून गेला. दुचाकीवरील दोघांना स्थानिक नागरिकांनी रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. अजनी पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून टेम्पोचालकाचा शोध घेत आहेत.

ड्रायव्हर-कंडक्टरला चौघांची मारहाण

यवतमाळवरून अमरावतीकडे जाणाऱ्या एसटी बसमध्ये चार ते पाच तरुणांच्या टोळक्याने राडा घालून एसटी चालक आणि वाहकाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. बसचालकाने टाटा मॅजिकला साईड देण्यासाठी हॉर्न वाजवला होता. मात्र, यावरून संतप्त झालेल्या टोळक्याने बसमध्ये चढून चालक-वाहकाला बेदम मारहाण केली. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना ४ जून रोजी वटफळी दोडकी येथील हनुमान मंदिराजवळ, नेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. प्राथमिक माहितीनुसार, एसटी बसचालकाने टाटा मॅजिकला साईड देण्यास सांगण्यासाठी हॉर्न वाजवला. यावरून संतप्त झालेल्या तरुणांनी बसमध्ये घुसून राडा घातला.४ ते ५ जणांनी मिळून एसटी चालक आणि वाहकावर हल्ला चढवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pandharpur Rain : भीमा-नीरा खोऱ्यात मुसळधार पाऊस; उजनी-वीर धरणातून मोठा विसर्ग | VIDEO

Maharashtra Live News Update: मनोज जरांगे पाटील आज बीड दौऱ्यावर

Navratri 2025: नवरात्रीत करा नारळाचा सोपा उपाय, होईल फायदा

Saptashrungi Gad : सप्तशृंगी दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी; या कालावधीत गडावर खासगी वाहतूक बंद

Rinku Rajguru: 'आवडतं तेच काम करं, आनंद नसेल तर...'; रिंकू राजगुरुला आई-वडिलांता मोलाचा सल्ला

SCROLL FOR NEXT