Rickshaw Accident in Nagpur Saam tv
महाराष्ट्र

Nagpur Accident: वाढदिवसाच्या सेलिब्रेशनवरुन येताना काळाचा घाला, मायलेकाचा जागीच मृत्यू

Rickshaw accident in Nagpur: रात्री वेगाने रिक्षा चालवताना नियंत्रण गेल्याने हा भीषण अपघात घडला. त्यात तरुण जागीच ठार झाला, तर डोक्याला मार लागल्याने त्याच्या आईचा मृत्यू झाला.

Saam Tv

Nagpur Accident: नागपूरमध्ये रिक्षा अपघातात मायलेकाचा जागीच मृत्यू झाला. एका खासगी कार्यक्रमापरुन परतत असताना हा अपघात झाला. रिक्षा रस्त्याच्या दुभाजकाला धडकून उलटी झाली आणि त्यात मुलासह त्याच्या आईने जीव गमावला. एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये ही घटना घडली आहे.

नागपूरच्या एमआयडीसी परिसरात गुरुवारी (२६ डिसेंबर) रात्री भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये रोहीत साखरे (वयवर्ष २५) आणि करुणा गोपाल साखरे (वयवर्ष ४९) या मायलेकाचा दुर्दैवी अंत झाला. चुलत बहिणीच्या मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला रोहित आणि त्याची आई गेले होते. कार्यक्रम संपल्यावर त्यांची रिक्षा एमआयडीसी-वाडी मार्गावरील प्लास्टो कंपनीजवळ दुभाजकाला धडकली. अपघातामध्ये रिक्षाचा चुराडा झाला. चुराड्यात अडकून रोहीतचा जीव गेला. तर त्याची आईच्या डोक्याला दुखापत झाल्याने त्यांचाही मृत्यू झाला.

रोहीत साखरे हा सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. त्याची आई करुणा अंगणवाडी सेविका होत्या. रोहीतचा धाकटा भाऊ रिक्षाचालक आहे. तो परगावी गेल्याने रोहीत स्वत: रिक्षा चालवून वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी पोहोचला होता. अपघाताच्या वेळी सुद्धा तो रिक्षा चालवत होता. रात्री रस्त्यावर वर्दळ नसल्याने त्याने रिक्षाचा वेग वाढवला. वेगवान रिक्षावरील नियंत्रण गेल्याने हा भीषण अपघात झाला.

अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लगेच तपासाला सुरुवात करत मृतदेह रुग्णालयात रवाना केले. दरम्यान प्राथमिक तपासामध्ये रोहीत साखरे हा चालक नसूनही रिक्षा चालवत होता. वेगात असलेली रिक्षा नियंत्रित करण्याचे कौशल्य नसल्याने हा अपघात झाला असे म्हटले जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी रोहीत साखरेवर गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Death: पोलीस दलात आत्महत्येचं सत्र काही थांबेना! ४ दिवसात ३ आत्महत्या, काय आहे कारण?

Mahalaxmi Vrat 2025 : महालक्ष्मी व्रताची तारीख, पूजा विधी, महत्व घ्या जाणून

Maharashtra Live News Update: ते वक्तव्य करून अजित पवारांकडून मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न; राम शिंदेंचा आरोप

Gunfire Shooting : क्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार! तिघांचा जागीच मृत्यू, आठजण जखमी

Astro Tips: सकाळी उठल्यावर आरशात पाहणे शुभ असते की अशुभ?

SCROLL FOR NEXT