Nagpur News Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur : अति व्यायामामुळे फाटली मेंदूतील रक्तवाहिनी; गोल्डन अवरमध्ये चमत्कार घडला, डॉक्टरांनी वाचवला तरुणाचा जीव

Nagpur News : नागपूरमध्ये २३ वर्षीय तरुणावर अतिव्यायाम, परीक्षेचा ताण आणि डोकेदुखीकडे दुर्लक्ष केल्यामुळे जीवघेणा प्रसंग ओढवला. वेळीच उपचार मिळाल्यामुळे त्याचा जीव वाचला.

Alisha Khedekar

  • नागपूरमध्ये २३ वर्षीय तरुणाची मेंदूतील रक्तवाहिनी फाटली

  • अतिव्यायाम आणि परीक्षेच्या ताणामुळे प्रकृती खालावली

  • आईच्या प्रसंगावधानामुळे वेळेत रुग्णालयात दाखल

  • ‘मेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमी’मुळे जीव वाचला

  • ‘गोल्डन अवर’ अत्यंत महत्त्वाचा

पराग ढोबळे, नागपूर

नागपूरमध्ये जिममधील अतिव्यायाम, परीक्षेचा ताण आणि सतत होणाऱ्या डोकेदुखीकडे दुर्लक्ष केल्याने २३ वर्षीय तरुणावर जीवघेणा प्रसंग ओढवल्याची बातमी समोर आली आहे. मात्र सुदैवाने त्याच्या आईमुळे वेळेत उपचार मिळाल्यामुळे तरुणाचा जीव थोडक्यात बचावला. ओम भोयर असे या तरुणाचे नाव असून, गेल्या आठ दिवसांपासून त्याला डोकेदुखीचा त्रास होत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, ओम हा परीक्षेची तयारी करत होता. रात्रभर जागरण, अभ्यासाचा ताण आणि दुसरीकडे जिममधील अतिव्यायाम यामुळे त्याच्या शरीरावर ताण वाढत गेला. सतत होणाऱ्या डोकेदुखीकडे त्याने दुर्लक्ष केले. मात्र अचानक त्याची प्रकृती खालावली आणि त्याला पॅरालिसीससारखी लक्षणे दिसू लागली.

ओमच्या आईला समजताच त्यांनी तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधला. त्यानंतर ओमला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. एमआरआय तपासणीत मेंदूत रक्तस्त्राव झाल्याचे आणि रक्ताची गुठळी तयार झाल्याचे स्पष्ट झाले. परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याने डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले.

या वेळी डॉक्टरांनी ‘मेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमी’ ही अत्याधुनिक शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. पायाच्या शिरेतून कॅथेटरच्या साहाय्याने मेंदूपर्यंत पोहोचून रक्ताची गुठळी काढण्यात आली आणि रक्तप्रवाह पुन्हा सुरळीत करण्यात आला. डॉक्टरांच्या वेळीच घेतलेल्या निर्णयामुळे ओमचा जीव वाचवण्यात यश आले.

सुरुवातीला व्हेंटिलेटरवर असलेला ओम अवघ्या दहा दिवसांत स्वतःच्या पायावर उभा राहिला. सध्या त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असून, तो घरी मेडिटेशन आणि औषधोपचार घेत आहे. डॉक्टरांनी सांगितले की, अशा परिस्थितीत पहिले सहा तास ‘गोल्डन अवर’ अत्यंत महत्त्वाचे असतात. वेळेत योग्य उपचार मिळाल्यास जीव वाचण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते. या घटनेतून अतिव्यायाम, ताण आणि शरीरातील लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये, असा महत्त्वाचा संदेश मिळतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT