Nag Panchami 2022, Satara, Chandrapur, Hingoli Saam Tv
महाराष्ट्र

Nag Panchami : नागपंचमी निमित्त महिलांनी लुटला झिम्मा फुगडी खेळण्याचा आनंद

आज राज्यभरात नागपंचमी उत्साहात साजरी केली जात आहे.

संजय तुमराम, राजेश काटकर

सातारा : नागाला दूध, लाह्या, फुटाणे यांचा नैवेद्य दाखवीत आज राज्यभरात नागपंचमी (nagpanchami) पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरी करण्यात आली. राज्यातील बत्तीस शिराळा, चंद्रपूर (chandrapur), हिंगाेली (Hingoli) तसेच सातारा (satara) येथे नागपंचमी निमित्त प्राचीन मंदिरात भाविकांची सकाळपासून गर्दी हाेती. (Nag Panchami News)

भद्रनागाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरात नागपंचमी (Nag Panchami 2022) निमित्त नाग मंदिर येथे यात्रेचे आयोजन करण्यात येते. यासाठी महाराष्ट्रा राज्यासह मध्यप्रदेश -तेलंगणातून भावीक दर्शनासाठी येत असतात. भद्रावती तालुक्याचे ग्रामदैवत म्हणजे भद्रनाग. अतिशय छोटे आणि सुबक असलेल्या या मंदिराला आणि इथल्या भद्र नागाच्या मूर्तीला लोकांमध्ये श्रद्धेचे स्थान आहे. हे मंदिर किमान एक हजार वर्षे जुने असल्याचे पुरातत्त्व दाखले आहेत.

सध्या अस्तित्वात असलेले हे मंदिर ११४६ साली बांधण्यात आले. ११४६ साली भद्रनाग मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलेला शिलालेख या ठिकाणी आजही आहे. हे संपूर्ण भद्रनाग मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधण्यात आले आहे. मंदिराचा आकार छोटा असला तरी हेमाडपंथी शैलीची सगळी वैशिष्ट्ये या मंदिरात आहेत. मंदिराला भक्कम असे ३६ खांब आहेत. आणि ९ फण्यांची शेषनागाची सुमारे अडीच फूट उंचीची मूर्ती आहे. मंदिरात प्रवेश करताच अतिशय प्रसन्न वाटते. यावर्षी कोरोना संदर्भातील सर्व निर्बंध सरकारने हटवल्यामुळे भद्रावती येथील भद्रनाग मंदिरात नागपंचमीची जोरदार यात्रा होत आहे. तसेच भाविकांची गर्दी होऊ नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Bhadranag

जगदंबा देवीच्या पालखीस मेंढ्यांनी घातले रिंगण

नागपंचमी सणाच्या निमित्त हिंगोलीत धनगर समाजाने रानमाळावर मेंढ्यासह जगदंबा देवीच्या पालखीला प्रदक्षिणा घातली. सेनगाव तालुक्यातील बाभुळगाव शिवारात हा अनोखा सोहळा पार पडला. साेमवारी (ता.एक) घोटा ते शेगाव ही जगदंबा देवीची पाई पालखी निघाली.

nag panchami celebration in hingoli

आज ही पालखी बाभुळगावात पोहचली. त्यानंतर आजचा सोहळा संपन्न झाला. दरम्यान डोळ्याचे पारणे फेडणारा हा अनोखा रिंगण सोहळा पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी व गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. (Nag Panchami)

Nag Panchami In Hingoli

साता-यात नागदेवतेच्या पुजनासाठी भाविकांची गर्दी

सातारा शहरात घरात घरात मातीच्या नागाची पूजा (Nag Panchami Pooja) महिलांनी केली. साता-यातील करंजे येथील नागोबा मंदिरात नागदेवतेच्या पुजनासाठी सकाळपासून भाविकांची गर्दी होती. आज पावसाने उघडीप दिल्याने विविध ठिकाणी महिलांनी झिम्मा फुगड्यांचा आनंद घेतला.

Edited By : Siddharth Latkar

Nag Panchami Pooja In Satara

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT