Har Ghar Tiranaga: पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावरचा डीपी बदलला, देशवासियांना केलं 'हे' आवाहन

15 ऑगस्ट 2022 ला भारत स्वातंत्र्य होवून 75 वर्ष पूर्ण होणार आहे. म्हणून यावर्षीचा स्वातंत्र्यदिवस भारतासाठी खूप मानला जात आहे.
PM Modi
PM ModiSaam Tv
Published On

नवी दिल्ली - देशाच्या अमृत महोत्सवा निमित्त 'हर घर तिरंगा' अभियान तुम्ही डिजीटल माध्यमातून देखील साजरी करु शकता. 31 जुलै रोजी प्रसारीत झालेल्या मन की बात या कार्यक्रमात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी या संबंधी माहिती दिली होती.

2 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दरम्यान स्वतच्या सोशल मिडीया प्लॉटफॉर्मचा प्रोफाईल पिक्चर बदलून या 13 दिवसाच्या कालवधीत तिरंगा प्रोफाईल पिक्चर म्हणून ठेवण्याचं आवहान पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे. पंतप्रधान मोदींच्या आवाहनाप्रमाणे मोदींनी आज खुद्द त्यांच्या सोशल मिडियाचा (Social Media) प्रोफाईल पिक्चर बदलून तिरंगा ठेवला आहे. तसेच देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी देखील स्वत:च्या प्रोफाईल पिक्चरवर तिरंगा ठेवला आहे.

मन की बात'मध्ये मोदींनी संवाद साधताना पंतप्रधानांनी 'हर घर तिरंगा' मोहिमेचा उल्लेख केला होता आणि 2 ते 15 ऑगस्ट दरम्यान लोकांना त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटचा पिक्चर बदलून तिरंगा प्रोफाईल पिक्चर म्हणून ठेवण्याचं आवहान केलं होत.

केंद्र सरकारच्या ‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत या महिन्यात तीन दिवस देशभरातील २० कोटींहून अधिक घरांवर तिरंगा फडकवला जाणार आहे. कार्यक्रमांतर्गत 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत लोकसहभागातून घरांवर तिरंगा फडकवण्यात येणार असून सरकारी आणि खाजगी आस्थापनेही यात सहभागी होणार आहेत.

PM Modi
मौज-मजा जिवावर बेतली; बदलापुरच्या बॅरेज धरणात दोन तरुण बुडाले

15 ऑगस्ट 2022 ला भारत स्वातंत्र्य होवून 75 वर्ष पूर्ण होणार आहे. म्हणून यावर्षीचा स्वातंत्र्यदिवस भारतासाठी खूप मानला जात आहे. हे संपूर्ण वर्ष आपण स्वातंत्र्याचा मृत महोत्सव म्हणून साजरा करत आहोत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत 'हर घर तिरंगा' अभियान राबविण्यात येत आहे. या मोहिमे अंतर्गत नागरिकांनी कार्यालयासह घरोघरी 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान राष्ट्रध्वज फडकवायचा आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com