Maharashtra Politics MVA Seate  the Quint
महाराष्ट्र

Maharashtra Politics: मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? ठाकरे-पवारांना किती जागा मिळणार?

Maharashtra Politics: विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिलीय..लोकसभेत सर्वाधिक जागा मिळवणारी काँग्रेस विधानसभेच्या सर्वाधिक जागा लढवण्याची शक्यता आहे.

Vinod Patil

विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिलीय..लोकसभेत सर्वाधिक जागा मिळवणारी काँग्रेस विधानसभेच्या सर्वाधिक जागा लढवण्याची शक्यता आहे. तर पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाला कमी जागा मिळणार असल्याचं समजतंय. मविआचा जागावाटपाचा काय फॉर्म्युला आहे आणि कोणते निकष आहेत यावरचा हा विशेष रिपोर्ट.

लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवण्यानंतर आता मविआनं आगामी विधानसभेसाठी जोरदार तयारी सुरू केलीय. त्यामुऴेच जागावाटपाता फॉर्म्युला ठरवण्यात मविआनं आघाडी घेतलीय. मविआचा जागा वाटपाचा फॉर्म्युला तयार झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

यात लोकसभेत सर्वाधिक यश मिळवलेल्या काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर त्याखालोखात ठाकरे गट आणि मग शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जागा देण्यात येणार आहेत. कसा असेल हा जागावाटपाचा फॉर्म्युला ते पाहूयात.

विधानसभेसाठी मविआचा फॉर्म्युला ठरला?

काँग्रेस 100-105 जागा लढवण्याची शक्यता

राष्ट्रवादी (SP) पक्ष 80-85 जागा लढवणार?

ज्याची जिथे ताकद अधिक त्याला त्याठिकाणी जागा सोडण्याचा निकष मविआनं लावलाय. कोणत्या भागात कुणाला अधिक जागा मिळू शकतील ते पाहूयात. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भाग आणि मुंबईतील काही भागांत काँग्रेसची ताकद. कोकणासह मुंबई, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भातील काही भागांत ठाकरे गटाचा प्रभाव

पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भागांत राष्ट्रवादी (SP) पक्षाची ताकद

लोकसभेच्या जागावाटपादरम्यान सांगलीसारख्या चुका टाळण्याचा प्रयत्न

लोकसभेपेक्षा विधानसभा निवडणूक अधिक ताकदीनं लढवण्याचा निर्धार

लोकसभेत काँग्रेसनं सर्वाधिक जागा जिंकल्यामुळे काँग्रेसनं सर्वाधिक जागांवर दावा केल्याचे संकेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत. तर लोकसभा निव़डणुकीत पवारांच्या राष्ट्रवादीनं सर्वात कमी जागा लढवल्या. त्यामुळे आता काँग्रेस आणि ठाकरेंनी विधानसभा जागा वाटपात मोठं मन दाखवण्याची मागणी रोहित पवारांनी केलीय.

असं असलं तरी मविआतले तीनही घटक पक्ष येत्या आठवडाभरात स्वतंत्र सर्वेक्षण करणार आहेत. लोकसभेत लढवलेल्या जागा आणि मिळालेल्या मतांच्या टक्केवारी लक्षात घेऊन हे सर्व्हेक्षण करण्यात येणार असल्याचं सांगितलं जातंय.

मविआतल्या प्रत्येक पक्षाचा तोंडावळा वेगळा आहे. राष्ट्रवादीला ग्रामीण भागात ठाकरेंच्या शिवसेनेला शहरी भागात तर काँग्रेसला विदर्भात अनुकूलता आहे. त्यामुळे कोणताही वाद न करता या आधारावर जागा वाटपाची चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र यात किती यश येणार हे प्रत्यक्ष जागावाटपातच कळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सर्वात मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीत मोठी उलथापालथ; प्रफुल्ल पटेलांना कार्याध्यक्षपदावरून हटवलं?

Places To Avoid Visit In Summer: एप्रिल- मे महिन्यात या 3 ठिकाणी बिलकूल भेट देऊ नका, गर्मीमुळे व्हाल हैराण

Borivali Tourism : चला वीकेंडला फिरायला! उन्हाळ्यात थंडावा देणारी 'बोरीवली'तील ५ सुंदर पिकनिक स्पॉट

Crime: सावत्र बाप करायचा लैंगिक अत्याचार; वैतागून घर सोडून पळालेल्या मुलीवर दोघांकडून सामूहिक बलात्कार

April 2026 Festival Calendar: एप्रिल महिन्यात कोणकोणते महत्वाचे सण आहेत? A टू Z माहिती एकाच क्लिकवर

SCROLL FOR NEXT