Car washing mistakes: कार धुताना या 5 चुका करणं टाळा

Surabhi Jayashree Jagdish

कार धुणं

कार धुणं हे सोपं काम वाटतं, पण चुकीच्या पद्धतीने कार धुतल्यास तिच्या पेंटवर परिणाम होऊ शकतो. काही चुका केल्यामुळे कारवर स्क्रॅच किंवा पाण्याचे डाग पडू शकतात. त्यामुळे कार धुताना काही गोष्टी आवर्जून टाळायला हव्यात.

Car cleaning tips | SAAM TV

कडक उन्हात कार धुवू नका

कडक उन्हात कार धुणं टाळा. उन्हामुळे पाणी कारच्या पृष्ठभागावर लवकर सुकते. त्यामुळे कारवर पाण्याचे डाग राहू शकतात.

Car maintenance | SAAM TV

जुने कपडे वापरू नका

कार पुसण्यासाठी घरातील जुने कपडे वापरणं टाळावं. अशा कपड्यांमुळे कारच्या पेंटवर स्क्रॅच पडू शकतात. कार पुसण्यासाठी योग्य मायक्रोफायबर कापड वापरणं योग्य आहे.

Car scratches | SAAM TV

डिशवॉश लिक्विडने कार धुवू नका

कार धुण्यासाठी डिशवॉश लिक्विडचा वापर करू नये. हे कारच्या पेंटसाठी बनवलेलं नसतं. त्यामुळे कारची चमक कमी होऊ शकते.

Car water stains | SAAM TV

एकाच बादलीतील पाण्याने संपूर्ण कार धुवू नका

संपूर्ण कार धुण्यासाठी एकाच बादलीतील पाणी वापरणं टाळावं. कारवरील माती घाण पाण्यात मिसळत जाते. त्याच पाण्याने पुन्हा कार धुतल्यास घाण कारच्या पेंटवर परत लागू शकते.

Car wash cloth | SAAM TV

धुतल्यानंतर कार तशीच सोडू नका

कार धुतल्यानंतर ती आपोआप सुकण्यासाठी सोडू नये. कारच्या पृष्ठभागावर राहिलेलं पाणी सुकल्यानंतर डाग पडू शकतात. त्यामुळे धुतल्यानंतर स्वच्छ कापडाने कार पुसावी.

Car cleaning products | SAAM TV

योग्य पद्धत वापरा

कार धुताना योग्य पद्धत आणि योग्य साहित्य वापरणं महत्त्वाचं आहे. कार धुतल्यानंतर तिच्या पृष्ठभागावर पाणी राहणार नाही याची काळजी घ्यावी. योग्य पद्धतीने कारची स्वच्छता केल्यास तिचा पेंट आणि चमक चांगली ठेवता येते.

Car care tips | SAAM TV

Heart attack symptoms: 1 महिना अगोदर ही 5 लक्षणं दिसली तर समजा हार्ट अटॅक येणारे!

Heart health warning signs | SAAM TV
येथे क्लिक करा