Asha Sevika Strike  Saam Tv
महाराष्ट्र

Asha Sevika Strike: मोठी बातमी! संभाजीनगरमधील 440 आशा स्वयंसेविकांचं तडकाफडकी निलंबन; प्रशासनाचा खळबळजनक निर्णय

Asha Sevika Suspended: संभाजीनगर महानगरपालिकेतील 440 आशा स्वयंसेविका निलंबित करण्यात आलंय. मानधनवाढीसह आपल्या विविध मागण्यांसाठी महिनाभरापासून आशा सेविकांचा संप होता.

Rohini Gudaghe

Sambhajinagar News Asha Sevika Suspended

आशा सेविकांचा (Asha Sevika) मानधनवाढीसह आपल्या विविध मागण्यांसाठी महिनाभरापासून राज्यव्यापी संप सुरु आहे. संभाजीनगर येथेही हा संप पुकारण्यात आला होता. या संपात संभाजीनगर महापालिकेच्या आरोग्य विभागातील 511 आशा स्वयंसेविका सहभागी झाल्या होत्या. यापैकी ४४० आशा स्वयंसेविकांना निलंबित करण्यात आलंय. (Latest Marathi News)

आपल्या विविध मागण्यांसाठी महापालिकेच्या (Chhatrapati Sambhajinagar) आरोग्य विभागातील जवळपास 500 पेक्षा अधिक आशा स्वयंसेविकांनी एक महिन्यापासून बेमुदत संप पुकारला आहे. आरोग्यसेवेला वेठीस धरल्याबद्दल आशा स्वयंसेविकांनी 24 तासांत रुजू व्हावं, अन्यथा निलंबनाची कारवाई करण्याचा इशारा मनपाकडून गुरुवारी नोटिसीद्वारे देण्यात आला होता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आशा सेविकांना निलंबित करण्याचा निर्णय

काल प्रशासनानं नोटीस बजावल्यानंतर 71 स्वयंसेविका रुजू झाल्या होत्या. मात्र, उर्वरित 440 स्वयंसेविका रुजू झाल्या नाहीत. त्यामुळे रात्री प्रशासक जी. श्रीकांत यांनी त्यांना निलंबित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या कारवाईमुळे आशा स्वयंसेविकांमध्ये मोठी खळबळ उडाली (Sambhajinagar News) आहे.

संभाजीनगरमधील 440 आशा स्वयंसेविकांचं तडकाफडकी निलंबन झालं आहे. प्रशासनानं खळबळजनक निर्णय घेतल्यामुळे आशा सेविकांमध्ये (Asha Sevika Strike) एकच खळबळ उडाली आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेवकांचा गेल्या एक महिन्यापासून बेमुदत संपत सुरू होता.

आशा सेविकांना नोटीस

13 फेब्रुवारीपासून छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतर्फे 1 ते 19 वर्षे वयोगटातील मुलांसाठी जंतनाशक गोळी अभियान राबवण्यात येणार आहे. आशा सेविकांच्या संपामुळं या अभियानात मोठी अडचण येणार आहे. ही बाब लक्षात घेत महापालिका आयुक्त श्रीकांत चांगलेच ॲक्शन मोडवर आले आहे. 24 तासांत कामावर हजर व्हा, अन्यथा निलंबित केलं जाईल अशी अंतिम नोटीस त्यांनी आशा सेविकांना बजावली होती.

मानधनवाढीसह आपल्या विविध मागण्यांसाठी आशा संघटनेचा राज्यव्यापी संपात महापालिकेच्या आरोग्य विभागातील 511 आशा स्वयंसेविका सहभागी झाल्या होत्या. नोटीस बजावल्यानंतर कामावर हजर न झालेल्या आशा सेविकांना निलंबित (Asha Sevika Suspended) करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rent Or Buy Home: रेंटवर राहावं की EMI वर घर खरेदी करावे? हक्काचं घर खरेदी करण्याआधी गणित समजून घ्या

Chandra Grahan 2025 : शेवटच्या चंद्रग्रहणाच्या सुतक काळाची वेळ काय?

Maharashtra Live News Update: फडणवीस कुटुंबीयांकडून अनंत चतुर्दशीनिमित्त पूजा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घराला कोण करणार टाटा,बाय-बाय? सलमान खानने दिला मोठा धक्का

SCROLL FOR NEXT