Asha Sevika Morcha: वाढत्या महागाईच्या काळात प्रपंच चालवणे कठीण, आशा सेविकांचा सरकारवर राेष; नाशकात भव्य माेर्चा

Asha Worker's Protest: काेराेना काळनंतर आशा सेविकांकडे सरकारचे दुर्लक्ष हाेत असल्याचे म्हटले जात आहे.
nashik - Asha Worker's Protest
nashik - Asha Worker's Protestsaam tv
Published On

- तबरेज शेख

Asha Sevika Morcha

नाशिक जिल्हा परिषदेवर आशा वर्करच्या (asha sevika) विविध मागण्यांसाठी आयटकच्या वतीने आज (साेमवार) मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदाेलकांनी जिल्हा परिषदेच्या गेटवर ठिय्या आंदोलन देखील केले. (Maharashtra News)

nashik - Asha Worker's Protest
Talegaon MIDC : ...अन्यथा तळेगाव एमआयडीसी बुधवारी बंद पाडणार : आमदार सुनील शेळके

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांची नेमणूक झाल्यापासून दिवसेंदिवस कामाचा दबाब वाढवण्यात येत आहे. अल्प मोबदल्यात काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका स्वतः विधवा, घटस्फोटीत किंवा ज्यांची आर्थिक बाजू कमकुवत आहे अशा असून वाढत्या महागाईच्या काळात प्रपंच चालवणे कठीण होत आहे.

nashik - Asha Worker's Protest
Navratri Festival 2023 : नवरात्राेत्सवासाठी एसटी महामंडळ सज्ज, तुळजापुरसाठी जादा बसचे नियाेजन

ऑनलाईन कामाच्या दबावामुळे राज्यभर तील २ आशा चा मृत्यू झाला आहे. ७२ प्रकारची काम आशा करतात. त्या कामावर आँनलाईन कामामुळे परिणाम होत आहे. ते काम कॉम्प्युटर ऑपरेटर नेमणूक करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी निवेदनाद्वारे मागण्या करण्यात आल्या.

गट प्रवर्तक कर्मचा-यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन शासकीय वेतन श्रेणी व भत्ते लागू करावेत. जोपर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा दिला जात नाही तोपर्यंत त्यांना कंत्राटी कर्मचा-यांना लागू असलेली वेतनश्रेणी देण्यात यावी.

कंत्राटी कर्मचा-यांना लागू असलेली वार्षिक वेतन वाढ 5 टक्के व अनुभव बोनस 15 टक्के देण्यात यावा या खेरीज गट प्रवर्तक यांना प्रवास भत्ता देण्यात यावा. आशा वर्करला किमान वेतन, दिवाळी भाऊबीज दहा हजार रुपये लागू करण्यात यावी.

आशा वर्कर व गट प्रवर्तक यांना ऑनलाईन कामे करण्याची शक्ती करू नये,विना मोबदला कामे सांगू नये.आरोग्य खात्यातील 50 टक्के रिक्त जागा पात्रतेनुसार आशा व गट प्रवर्तक मधून भरा. आभा कार्ड,गोल्डन ई कार्ड काढण्याची सक्ती करण्यात येऊ नये.गटप्रवर्तक यांचा आशा सुपरवायजर नामोल्लेख करण्यात यावा अशई मागण्या करण्यात आल्या.

Edited By : Siddharth Latkar

nashik - Asha Worker's Protest
Trains Cancelled : 17 ऑक्टोबरपर्यंत शालीमार एक्सप्रेस रद्द, जाणून घ्या कारण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com