Mumbai South Saam TV
महाराष्ट्र

Mumbai South Lok Sabha : दक्षिण मुंबईत महायुतीचा उमेदवार कोण? तीन नावांची जोरदार चर्चा

Mumbai South Lok Sabha Constituency : मंगल प्रभात लोढा, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि शिवसेना नेते यशवंत जाधव प्रचारासाठी सक्रिय झाले आहेत. तीन इच्छुकांमुळे महायुतीचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत.

Ruchika Jadhav

सुरज सावंत

Lok Sabha Election 2024 :

राज्यात सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. येत्या १९ तारखेला पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. मात्र अद्यापही महायुतीमध्ये जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. त्यात दक्षिण मुंबई मतदारसंघ चर्चेत आला आहे. येथे एकाचवेळी तीन इच्छुक उमेदवारांनी आपल्या प्रचाराला देखील सुरूवात केलीये.

त्यामुळे आता दक्षिण मुंबईतील महायुतीचा उमेदवार कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. एकाच वेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि शिवसेना नेते यशवंत जाधव प्रचारासाठी सक्रिय झाले आहेत. तीन इच्छुकांमुळे महायुतीचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. तर नेत्यांसमोर मोठा पेच निर्माण झालाय.

दक्षिण मुंबई मतदारसंघात उमेदवारी मिळावी यासाठी इच्छूक असलेले मंत्री मंगलप्रभात लोढा राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. थोड्याच वेळात ते शिवथीर्थ निवासस्थानी दाखल होतील, अशी माहिती समोर आली आहे.

मंत्री लोढा दक्षिण मुंबईतून लोकसभा लढवण्यास इच्छुक आहेत. अशात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर आता लोढा यांना त्यांचा पाठिंबा मिळाला तर दक्षिण मुंबईत महायुतीची जागा भक्कम होईल. त्यामुळे मंत्री लोढा राज ठाकरेंकडे पाठिंबा मागण्याची शक्यता आहे.

दक्षिण मुंबई मतदार संघात महाविकास आघाडीचा उमेदवार फिक्स करण्यात आला आहे. महाविकास आघाडीकडून ही जागा ठाकरे गटाला मिळाली असून अरविंद सावांत यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. एकीकडे अरविंद सावंत यांनी देखील आपल्या प्रचाराला सुरुवात केलीये तर दुसरीकडे या जागेसाठी महायुतीचा उमेदवारच अद्याप ठरलेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर प्रचंड वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबलचक रांगा | VIDEO

Serial TRP: 'ठरलं तर मग' की 'थोड तुझ थोड माझं'; टीआरपीच्या शर्यतीत कोणी मारली बाजी?

अंतराळात अन्न पचण्यासाठी किती तासांचा कालावधी लागतो?

Naigaon News : वसईमध्ये भयंकर घटना, १० हजार किलो काचेचा ढिग अंगावर कोसळला; २ कामगारांचा मृत्यू

Maharashtra Politics: शिक्कामोर्तब! ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार

SCROLL FOR NEXT