CM Eknath Shinde On Maratha Reservation GR Saamtv
महाराष्ट्र

Eknath Shinde: 'आजचा दिवस ऐतिहासिक; मी शब्द पाळणारा नेता...' मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

CM Eknath Shinde On Maratha Reservation GR: सरकारने मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून तसा जीआर मनोज जरांगे पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. या विजयानंतर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवरायांसमोर घेतलेली शपथ पुर्ण केली, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.

Gangappa Pujari

CM Eknath Shinde Speech:

मराठा समाजाचा प्रदीर्घ काळ चाललेला आरक्षणाचा लढा अखेर संपला असून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश आले आहे. सरकारने मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून तसा जीआर मनोज जरांगे पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. या विजयानंतर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवरायांसमोर घेतलेली शपथ पुर्ण केली, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.

काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

"या आंदोलनाकडे सर्वांचेलक्ष लागले होते. आपली एकजुट आपण कायम ठेवली. अतिशय संयम आणि शिस्तीने आंदोलन पुर्ण केलं. कुठेही गालबोट न लावता हे आंदोलन यशस्वी केलं. कोणालाही त्रास होणार नाही, याची काळजी घेतली. मराठा समाजासाठी न्याय मागणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) यांचे कौतुक," असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

"मराठा समाजासाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. आपले सरकार घेणारे नाही तर देणारे सरकार आहे. मी दिलेला शब्द पाळला. शिवरायांसमोर घेतलेली शपथ पुर्ण केली, आम्ही दिलेला शब्द पाळतो," असेही मुख्यमंत्र्यांनी (Eknath Shinde) यावेळी सांगितले.

"आज गुलाल उधळण्याचा दिवस आहे. मराठा बांधवांच्या सर्व मागन्या मान्य केल्या आणि केवळ तुमच्या प्रेमापोटी इथे आलो. मराठा समाज म्हणत होता की कुणाच्या ताटातील नको, आमच्या हक्काचं हवं आहे. त्याचप्रमाणे आपण आरक्षण दिले," असे मुख्यमंत्र्यांनी नमुद केले. (Latest Marathi News)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: टिटवाळातील काळूनदीत २ बहिणींचा बुडून मृत्यू

Smartphone Hanging: तुमचा फोन वारंवार हॅंग होतो का? मग 'या' टिप्स करा फॉलो

Balen Shah: Gen-Z क्रांती! कर्नाटकात शिक्षण, नंतर महापौर, प्रसिद्ध रॅपर नेपाळचा कारभार हाकणार?

Maharashtra Politics: मोठी उलथापालथ; ठाण्यात शिंदेंची राजकीय खेळी; भाजपच्या आठ शिलेदारांचा शिवसेनेत प्रवेश

RBI Vacancy 2025 : RBIमध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! १० ऑगस्टपासून ऑफिसर पदासाठी भरती

SCROLL FOR NEXT