OBC On Maratha Reservation: सरकारने OBC आरक्षणावर वरवंटा फिरवला; ओबीसी नेत्यांनी व्यक्त केली नाराजी

Press conference of OBC leaders: राजपत्र घेऊन मुख्यमंत्री वाशी येथे उपोषणस्थळी रवाना झाले आहेत. असा निर्णय घेऊन सरकारने ओबीसी आरक्षणावर वरवंटा फिरवला आहे, अशी प्रतिक्रिया ओबीसी नेत्यांनी व्यक्त केली आहे.
OBC On Maratha Reservation
OBC On Maratha ReservationSaam TV
Published On

Maratha Reservation:

मुख्यामंत्र्यांनी मराठ्यांच्या जुन्या 'कुणबी' नोंदीच्या आधारावर त्यांच्या सग्या-सोयऱ्यांना कुणबी दाखला देण्याचा निर्णय रात्री २:३० वाजता घेतला आहे. त्याचे राजपत्र घेऊन मुख्यमंत्री वाशी येथे उपोषणस्थळी रवाना झाले आहेत. असा निर्णय घेऊन सरकारने ओबीसी आरक्षणावर वरवंटा फिरवला आहे, अशी प्रतिक्रिया ओबीसी नेत्यांनी व्यक्त केली आहे.

OBC On Maratha Reservation
Maratha Reservation News : पालकमंत्री Deepak Kesarkar आणि मंगल प्रभात लोढा जरांगेच्या भेटीला!

सरकारने काढलेल्या अध्यादेशावरून ओबीसी बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्यात. त्यामुळे या निर्णयाविरोधात प्रतिक्रिया देण्यासाठी आज १२:०० वा. ओबीसी नेत्यांनी तातडीची पत्रकार परिषद बोलावली आहे.

या पत्रकार परिषदेत प्रकाश आण्णा शेंडगे, कुणबी समाज नेते चंद्रकांत बावकर, आगरी समाज नेते जे.डी तांडेल उपस्थित असणार आहेत, अशी माहिती मिळालीये.

मनोज जरांगे पाटील लढ्यात जिंकले, पण तहामध्ये हरले- ओबीसी नेत्याची मोठी प्रतिक्रिया

" मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आरक्षणाचा लढा तीव्रतेने लढला. त्यांना मराठा बांधवांनी प्रचंड प्रतिसाद देखील दिला. एक प्रकारे त्यांनी ही लढाई जिंकली, परंतु तहामध्ये माञ ते हरले, असेच चित्र उभे ठाकले आहे", अशी प्रतिक्रिया माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी दिलीये.

ओबीसी आरक्षणाला भूकंपाचे धक्के

"मनोज जरांगे यांच्या लढ्याला जरी यश मिळाले असेल, तरी निश्चितच मंत्री छगन भुजबळ, प्रकाश शेंडगे आणि ओबीसीच्या लढ्याला अपयश आले आहे. सरकारने ओबीसी आरक्षणाला साधे धक्के नाही तर, भूकंपाचे धक्के दिलेत", अशी खंतही राठोड यांनी व्यक्त केली आहे.

OBC On Maratha Reservation
Maratha, OBC Reservation: मराठा समाज आल्यावर ओबीसींचं संपूर्ण आरक्षणच फस्त करतील, ओबीसी नेते आक्रमक

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com