Mumbai–Nanded Special Trains Ready for Festive Season Travel Saam Tv
महाराष्ट्र

Mumbai–Nanded Weekly Special Trains: सणासुदीच्या काळात प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मुंबई–नांदेड दरम्यान ४ विशेष गाड्या सुरू

Mumbai To Nanded Special Trains September 2025: मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस आणि हुजूर साहेब नांदेड दरम्यान ४ विशेष रेल्वे गाड्या चालवल्या जात आहेत. सणासुदीच्या काळात प्रवाशांना मोठा दिलासा देणाऱ्या या गाड्यांमध्ये वातानुकूलित, शयनयान आणि सामान्य डबे उपलब्ध आहेत.

Omkar Sonawane

सणासुदीच्या काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई आणि हुजूर साहेब नांदेड दरम्यान ४ विशेष रेल्वे गाड्या चालवणार असून यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

तपशील खालीलप्रमाणे:

लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) – हुजूर साहेब नांदेड – लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) साप्ताहिक विशेष (४ सेवा)

गाड्यांची वेळापत्रके:

गाडी क्रमांक 07604: २३ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत दर मंगळवारी मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनसहून १६:३५ वाजता सुटेल; दुसऱ्या दिवशी ०६:३० वाजता हुजूर साहेब नांदेड पोहोचेल.

गाडी क्रमांक 07603: २२ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर २०२५ पर्यंत दर सोमवारी हुजूर साहेब नांदेडहून २३:४५ वाजता सुटेल; दुसऱ्या दिवशी १३:४० वाजता मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस पोहोचेल.

संरचना

एक वातानुकूलित प्रथम, दोन वातानुकूलित द्वितीय, सहा वातानुकूलित तृतीय, सहा शयनयान, चार सामान्य द्वितीय, दोन जनरेटर कार व एक पॅन्ट्री कार.

या ठिकाणी गाडी थांबणार

ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, नागरसोल, रोटेगाव, लासूर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, मानवत रोड, परभणी आणि पूर्णा.

आरक्षण

विशेष गाडी क्रमांक 07604 साठी आरक्षण २०.०९.२०२५ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच [www.irctc.co.in](http://www.irctc.co.in) या संकेतस्थळावर सुरू होईल. आरक्षित नसलेल्या डब्यांची तिकिटे यूटीएस (UTS) द्वारे बुक करता येतील. यासाठी सुपरफास्ट मेल/एक्स्प्रेस गाड्यांप्रमाणेच सामान्य भाडे लागू राहील.

तपशीलवार वेळापत्रक व थांब्यांसाठी [www.enquiry.indianrail.gov.in](http://www.enquiry.indianrail.gov.in) या संकेतस्थळाला भेट द्या किंवा NTES अ‍ॅप डाउनलोड करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Thane Road Traffic : भिवंडी-ठाणे महामार्गावर वाहतूक कोंडी; रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

कांद्याचे दर कोसळले; नाफेडच्या कांदा वाहतुकीविरोधात रयत क्रांती संघटना आक्रमक|VIDEO

Maharashtra voters : 7 महिन्यात वाढले 14 लाख मतदार, विधानसभेनंतर पुन्हा मोठी मतदारवाढ; काय परिणाम होणार?

Chhagan Bhujbal : 'जरांगेंना पाठिंबा देणाऱ्यांना धडा शिकवणार'; मराठा नेते छगन भुजबळांच्या टार्गेटवर, VIDEO

Maharashtra Politics: शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंची फिल्डिंग, महापालिकेसाठी ठाकरें बंधूंचा मास्टरप्लॅन

SCROLL FOR NEXT