Express Way: राज्यात तयार होणार आणखी एक एक्स्प्रेस वे, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; ९३१ कोटी रूपये मंजूर

Maharashtra New Expressway: महाराष्ट्राला आणखी एक नवा एक्स्प्रेस वे मिळणार आहे. फडणवीस सरकारने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठी घोषणा केली. या एक्स्प्रेस वेसाठी ९३१ कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहे.
Express Way: राज्यात तयार होणार आणखी एक एक्स्प्रेस वे, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; ९३१ कोटी रूपये मंजूर
Maharashtra New ExpresswaySaam Tv
Published On

Summary -

  • महाराष्ट्र सरकारने भंडारा ते गडचिरोली दरम्यान ९४ किमी लांबीच्या एक्स्प्रेस वेला मान्यता दिली आहे.

  • या प्रकल्पासाठी एकूण ९३१.१५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

  • या प्रवासाचे अंतर २३ किमीने कमी होऊन प्रवासाचा वेळ सव्वा तासावर येईल.

  • विदर्भातील संपर्क सुविधा आणि आर्थिक विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

राज्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात आणखी एक एक्स्प्रेस वे तयार होणार आहे. भंडारा ते गडचिरोली ९४ किलोमीटरचा एक्स्प्रेस वे तयार केला जाणार आहे. फडणवीस सरकारने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये याबाबतची घोषणा केली. भुसंपादनासह अनुषंगिक ९३१ कोटी १५ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता दिली आहे.

Express Way: राज्यात तयार होणार आणखी एक एक्स्प्रेस वे, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; ९३१ कोटी रूपये मंजूर
Maharashtra Government: रस्त्यांना मिळणार विशिष्ट नंबर, रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय

मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा-गडचिरोली प्रवेश नियंत्रित एक्स्प्रेस वेच्या प्रकल्पाच्या सुधारित आखणीस आणि हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत हाती घेण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पामुळे भंडारा ते गडचिरोली प्रवासाचे अंतर २३ किलोमीटरने कमी होईल आणि प्रवासाचा कालावधी सव्वा तासावर येईल.

Express Way: राज्यात तयार होणार आणखी एक एक्स्प्रेस वे, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; ९३१ कोटी रूपये मंजूर
Maharashtra Government : फडणवीस सरकारचा मास्टरस्ट्रोक; राज्यातील २ रेल्वे मार्गाला ग्नीन सिग्नल, वाचा सविस्तर

नागपूर- मुंबई दरम्यानचे प्रवास अंतर आणि कालावधी कमी करण्यासाठी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्ग पूर्ण करण्यात आला आहे. विदर्भातील रस्ते वाहतुकीचे जाळे भक्कम करण्यासाठी भंडारा ते गडचिरोली प्रवेश नियंत्रित एक्स्प्रेस वेच्या अंतिम आखणीस २७ डिसेंबर २०२३ च्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे.

Express Way: राज्यात तयार होणार आणखी एक एक्स्प्रेस वे, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; ९३१ कोटी रूपये मंजूर
Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

आता या महामार्गांतर्गत नागपूर -गोंदिया प्रवेश नियंत्रित शीघ्रसंचार एक्स्प्रेस वेच्या सावरखंडा इंटरचेंजपासून राज्य महामार्ग ५३ वरील कोकणागडपर्यंत प्रवेश नियंत्रित शीघ्रसंचार एक्स्प्रेस वे बांधणे आणि बोरगाव इंटरचेंज ते राज्य महामार्ग ३५३ ड वरील रणमोचनपर्यंत प्रवेश नियंत्रित शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग बांधणे अशा एकूण ९४.२४१ किलोमीटरच्या सुधारित आखणीस मान्यता देण्यात आली.

हा प्रोजेक्ट राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत हाती घेण्यास आणि प्रोजेक्टसाठी भूसंपादनाची कार्यवाही करण्यासही मान्यता देण्यात आली. त्यासाठी तब्बल ५३४.४६ कोटी आणि व्याजापोटी ३९६.६९ कोटी असे एकूण ९३१.१५ कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली.

Express Way: राज्यात तयार होणार आणखी एक एक्स्प्रेस वे, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; ९३१ कोटी रूपये मंजूर
Maharashtra Government: सरकारच्या तिजोरीवर लोकप्रिय योजनांचा ताण; महाराष्ट्राच्या डोक्यावर ९ लाख कोटींचं कर्ज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com