Maharashtra Government: सरकारच्या तिजोरीवर लोकप्रिय योजनांचा ताण; महाराष्ट्राच्या डोक्यावर ९ लाख कोटींचं कर्ज

Maharashtra Debt Rises: लाडकी बहीण योजनेसारख्या लोकप्रिय योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण पडत आहे. महाराष्ट्रावरील कर्जाचा बोजा ₹९.४ लाख कोटींच्या जवळ पोहोचला आहे. कर्जाचा दबाव वाढण्याचा इशारा वित्त विभागाने दिला आहे.
Maharashtra Debt  Rises
Maharashtra treasury under pressure as debt burden rises to ₹9 lakh crore due to populist schemes.saamtv
Published On
Summary
  • महाराष्ट्रावर ९ लाख कोटींपर्यंत कर्जाचा बोजा होण्याची शक्यता.

  • लाडकी बहीण योजना आणि इतर लोकप्रिय घोषणांमुळे कर्ज वाढलं.

  • पहिल्या तिमाहीतच २४ हजार कोटींचं कर्ज घेतलं गेलं.

  • वित्त विभागाच्या अहवालानं सरकारच्या डोकेदुखीत वाढ केली.

लाडकी बहीण योजनेसह इतर लोकप्रिय घोषणांमुंळे राज्यावर कर्जाचा बोजा वाढलाय. या वर्षाअखेरीस राज्यावरील कर्जाचा बोजा ९ लाख कोटींपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. निवडणूक काळात केलेल्या योजनांमुळे सरकराची डोकेदुखी वाढलयी. योजनांची घोषणा आणि विस्कटलेली आर्थिक घडी बसवण्यासाठी कर्जाचा बोजा वाढू लागलाय.

जून महिन्याच्या अखेरपर्यंत ८ लाख ५५ हजार ३९७ कोटी रुपयांपर्यंत कर्ज पोहचलं. या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच तिमाहीत २४ हजार कोटींचं कर्ज राज्य सरकारने घेतले आहे, त्यामुळे ९ लाख ४२ हजार २४२ कोटी रुपयांचं कर्ज या आर्थिक वर्षात होण्याची शक्यता वित्त विभागाने वर्तवलीय. राज्य सरकारला स्थूल उत्पन्नाच्या २५ टक्के कर्ज घेता येतं. मात्र आतापर्यंत सरकारने १८ टक्के कर्ज घेतलंय. या वर्षाच्या अखेरीस राज्य सरकारला कर्जावरील व्याज ६४ हजार ६५९ कोटी रुपये द्यावं लागेल.

Maharashtra Debt  Rises
मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढच्या वर्षी, सुप्रीम कोर्टाने दिली शेवटची मुदतवाढ

राज्यावरील कर्जाचा डोंगर

२०२२-२ - ६ लाख २९ हजार २३५

२०२३-२४- ७ लाख १८ हजार ५०७

२०२४-२५ - ८ लाख ३९ हजार २७५

लाडकी बहीण यासारख्या खर्चिक लोकप्रिय योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर प्रचंड ताण पडतोय. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी याचा उल्लेख अनेकवेळा केला आहे. या योजनांचा बोजा केवळ तिजोरीवरच नाही, तर राज्याच्या आर्थिक स्थितीवरही पडत असल्याचं समोर आलंय. राज्यावर कर्जाचा बोजा सासत्यानं वाढत असून आर्थिक वर्ष संपेपर्यंत ९ ते १० लाख कोटींपर्यंत हे कर्ज जाणार आहे.

Maharashtra Debt  Rises
DCM Ajit Pawar : 'तिकीट देताना जातीपाती...'; आगामी निवडणुकांवर अजित पवारांचं मोठं विधान

त्यामुळे सरकार शेतकीर कर्जमाफीचे आश्वसन कसे पूर्ण करणार याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. याशिवाय अनेक योजनांना घरघर लागलेली असताना कर्ज आणि त्यावरचं भरमसाठ व्याज, याचा ताण राज्याची तिजोरी किती काळ सहन करणार, असा प्रश्न उपस्थित होतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com