DCM Ajit Pawar : 'तिकीट देताना जातीपाती...'; आगामी निवडणुकांवर अजित पवारांचं मोठं विधान

Sambhajinagar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर असताना येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मोठे विधान केले आहे. तसेच सुप्रीम कोर्टाने निवडणूका पुढे ढकलल्यचा निर्णय घेतला आहे.
DCM Ajit Pawar : 'तिकीट देताना जातीपाती...'; आगामी निवडणुकांवर अजित पवारांचं मोठं विधान
Mahrashtra Politics Saam Tv
Published On
Summary
  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या.

  • जातीपाती वा नातेगोत्याला तिकीट वाटपात स्थान नसेल. - अजित पवार

  • सुप्रीम कोर्टाचा आदेश – ३१ जानेवारी २०२६ पर्यंत निवडणुका पूर्ण व्हाव्यात.

  • दुष्काळग्रस्त भागांना सरकारकडून मदतीचे आश्वासन.

राज्यात जातीपातीवरून राजकारण तापलंय. मराठा-ओबीसीनंतर आता बंजारा-वंजारा समाजाकडून आरक्षणाची मागणी केली जातेय. त्याच दरम्यान अजित पवार यांनी आगामी निवडणुकांवरून जाती-पातीचा उल्लेख करून मोठं विधान केलं आहे. अजित पवार यांनी आपला पक्ष सर्वसमावेश असल्याचं पुन्हा एकादा स्पष्ट केलं आहे. आगामी निवडणुकांसाठी कोणत्याच समाजघटकाला डावळलं जाणार नाही, असं विधान उपमुख्यमंत्री यांनी केलं आहे.

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा पुढे ढकलल्या गेल्या आहेत. याच दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणुकांसाठी तिकीट वाटपाबबात मोठं विधान केलं आहे. " येत्या निवडणुकांचे तिकीट द्यायचे आपल्या हातात आहे. आपल्याला दिल्लीत जाऊन विचारायची गरज नाही. गेली चार वर्षे निवडणूक लांबली होती. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत निवडणुका घ्या असे म्हटले होते मात्र आम्हाला त्यात हस्तक्षेप करता येत नाही. ३१ जानेवारी २०२६ पर्यंत निवडणूक संपवून निकाल लावायचा. असे सुप्रीम कोर्टाने आदेश दिले आहे. निवडणुकीचे तिकीट देताना जातीपाती वा नातेगोत्याचा विचार होणार नाही. कोणत्याही समाजघटकाला वगळले जाणार नाही आणि सर्वांना न्याय दिला जाईल." असे अजित पवार आपल्या भाषणात म्हणाले.

DCM Ajit Pawar : 'तिकीट देताना जातीपाती...'; आगामी निवडणुकांवर अजित पवारांचं मोठं विधान
DCM Ajit Pawar : अहिल्यानगर–बीड–परळी रेल्वेमार्गाला 150 कोटींचा बुस्टर डोस; अजित पवारांची मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी भेट

अजित पवार यांनी राज्यातील सध्याच्या परिस्थितीवरही भाष्य केले. "मराठवाड्यासह जालना, बीड, नांदेड आदी जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत कॅबिनेट बैठकीत निर्णय घेण्यात आला असून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. मी कॅबिनेटमध्ये सूचनाही केली आहे की, दसऱ्यापर्यंत शेतकऱ्यांना आर्थिक मदत पोहोचली पाहिजे. अहवाल तातडीने तयार करून शेतकऱ्यांच्या नावासह शासनाला पाठवावा आणि थेट त्यांच्या खात्यावर मदत जमा केली जाईल."

DCM Ajit Pawar : 'तिकीट देताना जातीपाती...'; आगामी निवडणुकांवर अजित पवारांचं मोठं विधान
Ajit Pawar : राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षावर गुन्हा दाखल, अजित पवारांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मोठी कारवाई

कांद्याच्या घसरलेल्या भावामुळे निर्माण झालेल्या संकटावर सरकार उपाययोजना करत असल्याचेही पवारांनी नमूद यावेळी केले. महायुतीचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. संकटावर मात करण्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. त्यानंतर बोलताना अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com