Ajit Pawar : राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षावर गुन्हा दाखल, अजित पवारांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मोठी कारवाई

Solapur News : अजित पवार आणि आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यातील मोबाईलवरील संभाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Ajit pawar ips anjana krishna phone call controversy
Ajit pawar ips anjana krishna phone call controversyx
Published On
Summary
  • अजित पवार-आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा संभाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मोठी कारवाई.

  • राष्ट्रवादी माढा तालुका अध्यक्षासह १५ ते २० जणांवर गुन्हा दाखल.

  • बेकायदेशीर जमाव, गोंधळ आणि शासकीय कामात अडथळ्याप्रकरणी कारवाई.

भरत नागणे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Solapur : महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मोबाईल फोनवरुन तंबी दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बेकायदेशीर जमाव जमवून गोंधळ घालणे आणि शासकीय कामांमध्ये अडथळा निर्माण करणे यामुळे राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कुर्डू येथे बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन सुरु असल्याची माहिती आयपीएस महिला अधिकारी अंजना कृष्णा यांना मिळाली होती. त्यांनी घटनास्थळी जावून कारवाई सुरु केली. दरम्यान गावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी कारवाई रोखण्यासाठी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन लावला.

Ajit pawar ips anjana krishna phone call controversy
Beed : बीड पुन्हा हादरलं! शिक्षिकेवर १६ वर्षे अत्याचार, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याविरोधात गुन्हा

कार्यकर्त्यांच्या फोनवरुन अजित पवार यांनी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना कारवाई करु नका असे म्हणत तंबी दिली. त्यांच्या संभाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यावर विरोधी पक्षातील अनेकांनी अजित पवारांच्या कृतीवर आक्षेप घेतला, त्यांच्यावर टीका केली. जनशक्ती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अतुल खुपसे यांनी कारवाई करावी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढू असा इशारा दिला होता.

Ajit pawar ips anjana krishna phone call controversy
Pune Ganeshutsav : पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीबाबत पोलिसांचा मोठा निर्णय

आयपीएस अंजना कृष्णा आणि अजित पवार यांच्या संभाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बेकायदेशीर जमाव जमवून गोंधळ घालणे आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस माढा तालुका अध्यक्ष बाबा जगताप, संतोष कापरे, अण्णा ढाणे यांच्यासह १५ ते २० जणांवर कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना घडल्यानंतर ३ दिवसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ajit pawar ips anjana krishna phone call controversy
Maharashtra Politics : शिंदे गटाला हादरा, बड्या नेत्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com