Pune Ganeshutsav : पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीबाबत पोलिसांचा मोठा निर्णय

Pune : गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. विसर्जन मिरवणुकीत आता ढोल ताशा पथकांच्या संख्येवर सक्ती राहणार नसल्याचे पुणे पोलिासांनी स्पष्ट केले आहे.
Pune Ganeshutsav
Pune Ganeshutsav x
Published On
Summary
  • विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचा निर्णय

  • विसर्जन मिरवणुकीत आता ढोल पथकांच्या संख्येवर सक्ती नाही

  • पथकांची संख्या व पथकामधील सदस्यांची संख्या यावर सक्ती केली जाणार नसल्याचे पुणे पोलिसांनी केलं स्पष्ट

Pune Ganeshotsav : पुण्यात अनंत चतुर्दशीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. अशात पुण्यातील वादकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. पुण्यात ढोल ताशा पथकांच्या संख्येवर सक्ती न करण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे. विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. पथकांची संख्या व पथकामधील सदस्यांची संख्या यावर सक्ती केली जाणार नसल्याचे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. गणेश मंडळांना ढोल पथके लावण्याच्या परवानगीबाबत अखेर पेच मिटला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात विसर्जन मिरवणुकी दरम्यान गणेश मंडळांनी किती ढोल ताशा पथक लावायचे याबाबत प्रश्न उपस्थित केला जात होता. ढोल ताशा पथकांवर मर्यादा यावी अशी मागणी विविध स्तरातून केली जात होती. मानाचे गणपती तसेच शहरातील इतर प्रमुख गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये ढोल ताशा पथकांच्या संख्येवर तसेच वादकांच्या सदस्य संख्येवर निर्बंध यावेत अशी सुद्धा मागणी अनेकांनी केली होती. याविषयी ढोल ताशा महासंघ तसेच शहरातील प्रमुख ढोल ताशा पथकांची आणि पुणे पोलिसांची अनेक वेळा बैठक सुद्धा झाली. काल झालेल्या बैठकीनंतर ढोल ताशा महासंघाकडून आणि इतर ढोल ताशा पथकाकडून विसर्जन मिरवणुकीत ढोल ताशा पथकांच्या संख्येवर आणि सदस्य संख्येवर मर्यादा आणल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात आली होती.

Pune Ganeshutsav
Pune : गणेश विसर्जनानंतर मूर्तींचे छायाचित्रण-प्रसारणास मनाई! पुणे प्रशासनाचे आदेश, पालन न केल्यास होणार शिक्षा

आज पुन्हा एकदा पुणे पोलिसांनी पुण्यातील ढोल ताशा पथकांसह महासंघ प्रतिनिधी सोबत चर्चा केली आणि हा निर्णय मागे घेण्यात आला. त्यामुळे येथे शनिवारी होणाऱ्या विसर्जन मिरवणुकीत गणेश मंडळांच्या समोर तसेच ढोल ताशा पथकांसमोर असलेला तिढा अखेर सुटला आहे.

Pune Ganeshutsav
Pune Ganapati Visarjan: पुण्यातील मानाचे गणपती विसर्जन मिरवणुकीचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या संपूर्ण मार्ग

गणपती विसर्जन दरम्यान ढोल ताशा पथकाची संख्या व त्यामध्ये सदस्यांचे संख्या बद्दल काही मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. या विषयावर सर्वांगीण विचार करून असा निर्णय घेण्यात आला आहे की जो पर्यंत गणपती मंडळ ठरलेले वेळेचे पालन करतील तोपर्यंत पुणे पोलीस यांचे कडून पथकांचे संख्या व पथकामधील सदस्यांची संख्या यावर सक्ती केली जाणार नाही, अशी माहिती सह आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी दिली आहे.

Pune Ganeshutsav
Pune Metro: पुणेकरांसाठी गुड न्यूज! आणखी २ नवीन मेट्रो स्थानके होणार, ठिकाण नेमकं कुठे?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com