Pune Ganapati Visarjan: पुण्यातील मानाचे गणपती विसर्जन मिरवणुकीचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या संपूर्ण मार्ग

Pune Ganapati Visarjan Miravnuk 2025: पुणे पोलिसांनी गणपती विसर्जन २०२५ चे वेळापत्रक आणि मार्ग जाहीर करण्यात आलीय. गणपती विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पडावी यासाठी आदरणीय गणपती मिरवणुकीच्या वेळा, वाहतूक नियम आणि सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आलीय.
Pune Ganapati Visarjan Miravnuk 2025:
Pune Police announces schedule and route for 2025 Ganapati visarjan miravnuk with strict safety measures.saam tv
Published On
Summary
  • पुण्यातील मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीचे वेळापत्रक जाहीर.

  • वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग व विशेष नियम लागू.

  • पोलीस प्रशासनाने शिस्तबद्ध व सुरक्षित मिरवणुकीसाठी नियोजन केलं.

देशभरात यंदा गणेशोत्सव मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला. गावात, घर-घरात पूर्ण ९ -१० दिवस भक्तीमय वातावरण होतं. गजराज आल्याने घरात आनंदमय वातावरण निर्माण झालं होतं. बघता बघता गणरायाच्या परतीचे दिवस आले असून ६ सप्टेंबरला गणराया आपल्या भक्तांचा निरोप घेणार आहेत. पुण्यात गणपती विसर्जनाची मोठी मिरवणूक निघत असते. पुण्यातील मानाचे गणपतीच्या मिरवणुकीकरीता वाहतुकीत बंदल करण्यात येत असतात. पुण्यातील मानाचे गणपतीच्या मिरवणुकीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

पुण्याच्या पारंपरिक गणपती विसर्जनासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. मानाच्या पाच गणपतींसह इतर गणेश मंडळांसाठी नियमावली जाहीर करण्यात आलीय. विसर्जनादिवशी होणाऱ्या गर्दीच्या पाश्वभूमीवर विसर्जनाच्या वेळा प्रशासनानं ठरवून दिल्या आहेत. पुण्यातील गणेशोत्सवाचा उत्कर्षबिंदू असलेली विसर्जन मिरवणूक यावर्षी ठरावीक वेळापत्रकानुसार पार पडणार आहे.

पोलीस प्रशासन आणि गणेश मंडळांना नियमावली कळवण्यात आलीय. शिस्तबद्ध आणि सुरक्षित पद्धतीने मिरवणूक पार पडावी यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे, त्यासाठी नियमावली लागू करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

मिरवणुकीचे मार्गदर्शक नियम

पोलिसांनी नमुद करण्यात आलेल्या मार्गावरूनच विसर्जन मिरवणूक नेता येणार आहे. मंडळांना ठरवून दिलेल्या मार्गानेच विसर्जन मिरवणुकीत सामील होता येईल. लक्ष्मी रोडवरील मंडळे फक्त बेलबाग चौकातून प्रवेश करतील. कसबा गणपती जाईपर्यंत अलका टॉकीज चौकाजवळ इतर मंडळांना थांबावे लागणार आहे. मिरवणुकीदरम्यान मंडळांमध्ये अंतर राखणे बंधनकारक असून रेषा तोडण्यास परवानगी नसणार आहे.

Pune Ganapati Visarjan Miravnuk 2025:
Ganpati Visarjan : पुण्यात गणेश विसर्जनाला गालबोट, मुळशीमध्ये युवक बुडाला

ढोल-ताशा आणि डीजेवरील अटी

टिळक पुतळा ते बेलबाग चौकदरम्यान ढोल-ताशा वाद्य वाजवण्यास बंदी.

फक्त बेलबाग चौकानंतरच डीजे आणि ढोल-ताशाला परवानगी दिली जाईल.

प्रत्येक मंडळाला डीजे किंवा ढोल-ताशा पथक यापैकी एकच ठेवता येईल.

जास्तीत जास्त दोन ढोल-ताशा गटांना परवानगी असणार आहे. यात ६० सदस्य असतील.

तसेच ढोल-ताशा गटांनी विसर्जनानंतर अलका टॉकीज चौकात परतीच्या मार्गाने जाऊ नये,अशा सुचना देण्यात आल्या आहेत.

Pune Ganapati Visarjan Miravnuk 2025:
Ganesh Festival: गणेशोत्सव मंडळात महिला नाचवल्या, गणेशमूर्तीसमोर अश्लील डान्स ; बघा संतापजनक VIDEO

पुण्यातील मानाच्या गणपतींचे विसर्जन

मिरवणुकीसंदर्भात यंदाचे वेळापत्रक आणि मार्ग जाहीर करण्यात आलेत. पुण्याचा पहिला मानाचा कसबा गणपती सकाळी ९.१५ वाजता मंडईतील टिळक पुतळा येथे पोहोचेल. त्यानंतर सकाळी ९.३० वाजता मिरवणुकीची सुरुवात होईल.

कसबा गणपती सकाळी ९.३० वाजता बेलबाग चौकात दाखल होऊन १०.१५ वाजता लक्ष्मी रोडकडे मार्गस्थ होईल. दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपती सकाळी १०.३० वाजता बेलबाग चौकातून लक्ष्मी रोडकडे जाईल. सहावा मानाचा महापालिका गणपती आणि सातवा त्वेष्ट कासार गणपती दुपारी १.०० वाजता मिरवणुकीत सामील होणार आहे.

इतर मंडळांची काय असेल वेळ

लक्ष्मी रोड आणि शिवाजी रोडवरील मंडळे दुपारी३.४५ वाजता मुख्य मिरवणुकीत सामील होतील.

श्रीमंत दगडूशेठ गणपती दुपारी ४.०० वाजता,

तर जिलब्या मारुती आणि अखिल मंडई गणपती मंडळ संध्याकाळी ५.३० नंतर मिरवणुकीत सहभागी होतील. प्रशासनाच्या नियोजनानुसार संध्याकाळी ७.०० वाजेपर्यंत बेलबाग चौक रिकामा करण्यात येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com