Mumbai Local Mega Block Saam TV
महाराष्ट्र

Mumbai Local Mega Block: मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; रविवारी घरातून बाहेर पडण्याआधी वेळापत्रक पाहा

Mumbai Local News : मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Ruchika Jadhav

रविवारी सुट्टी असल्याने अनेक जण फिरण्यासाठी घराबाहेर पडतात. त्यामुळे मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे लोकल सेवेवर परिणाम होणार आहे.

वाचा मध्य रेल्वेचे वेळापत्रक

ठाणे ते कल्याणदरम्यान पाचवी आणि सहावी मार्गिका दुरुस्त करण्यात येणार आहे. त्यामुळे सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत येथील लांबपल्ल्याच्या गाड्या जलद मार्गावरून वळवण्यात येणार आहेत. त्यामुळे लोकल ट्रेन विलंबाने धावतील.

तसेच सकाळी ९.५० वाजताची वसई रोड-दिवा ट्रेन फक्त कोपरपर्यंत चालवली जाणार आहे. पुढे कोपर आणि दिवा स्थानकांदरम्यान काम सुरू असल्याने येथे लोकल रद्द करण्यात आलीये. सकाळी ११.४५ वाजताची दिवा-वसई रोड ट्रेन कोपरवरून चालवण्यात येईल.

वाचा हार्बर रेल्वेमार्गाचे वेळापत्रक

हार्बर रेल्वे मार्गावर देखील उद्या म्हणजेच रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पनवेल ते वाशी स्थानकादरम्यान, अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ०४.०५ पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. यामुळे ब्लॉक कालावधीत सीएसएमटी पनवेल/बेलापूर अप आणि डाऊन लोकल रद्द करण्यात येणार आहेत.

तसेच पनवेल ते ठाणे मार्गावर अप आणि डाऊन लोकल रद्द करण्यात येणार आहेत. ब्लॉक असलेल्या कालावधीमध्ये सीएसएमटी ते वाशीदरम्यान विशेष लोकल धावतील अशी माहिती आहे. ब्लॉक कालावधीत ठाणे - वाशी, नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लोकल सेवा उपलब्ध असेल.

पश्चिम रेल्वेमार्गाचे वेळापत्रक

बोरिवली ते राम मंदिरदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर देखील रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामध्ये सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत मार्गिकेचे काम सुरू राहणार आहे. मेगाब्लॉकमुळे बोरिवली ते अंधेरीदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील सर्व लोकल धीम्या मार्गिकेवर वळवल्या जाणार आहेत. तर यातील काही लोकल फेऱ्या रद्द देखील करण्यात येणारेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Exit Polls of Maharashtra : शेकापच्या बालेकिल्ल्यात धनुष्यबाण चालणार? पाहा एक्झिट पोल

पायात काळा धागा का बांधला जातो? जाणून घ्या

Baramati News : अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून झळकले फलक; बारामतीत कार्यकर्त्यांनी लावले फ्लेक्स

डॉक्युमेंटरीचा वाद सुरू असतानाच Dhanush अन् Nayanthara यांची एकाच सोहळ्याला हजेरी, 'तो' व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

Maharashtra Exit Poll : बेलापूर विधानसभा मतदारसंघातून मंदा म्हात्रे होणार आमदार? पाहा Exit Poll

SCROLL FOR NEXT