अलिबाग विधानसभा मतदारसंघ राज्यातील महत्वाचा मतदारसंघ मानला जातो. अलिबाग विधानसभा मतदारसंघाची शेकापचा बालेकिल्ला म्हणूनही ओळख आहे. या अलिबाग मतदारसंघात यंदा मोठा बदल होणार आहे. तीन टर्म अपक्ष उमेदवार जिंकून आलेल्या अलिबागमध्ये यंदा धनुष्यबाण चालणार असल्याची शक्यता सकाळ समूहाच्या एक्झिट पोलने दिली आहे. या एक्झिट पोलने शेकापचं टेन्शन वाढणार आहे.
अलिबाग विधासनभा मतदारसंघात शिंदे गटाने महेंद्र दळवी यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर शेतकरी कामगार पक्षाने चित्रलेखा पाटील यांना उमेदवारी दिली होती. मात्र, या मतदारसंघात शिंदे गटाचे महेंद्र दळवी आघाडीवर तर चित्रलेखा पाटील पिछाडीवर असल्याचं दिसत आहे.
अलिबाग विधानसभा मतदारसंघात नाव साध्यर्म पाहायला मिळालं. या मतदारसंघात शिवसेनेच्या महेंद्र दळवी यांच्या नावाची तीन उमेदवार रिंगणात होते. भाजपमधून बाहेर पडलेले दिलीप भोईर यांच्या नावाचाही एक उमेदवार रिंगणात होता. या उमेदवारांची लढत शेकापच्या चित्रलेखा पाटील यांच्याशी होती.
लोकसभा निवडणुकीनंतर अलिबागमधील चित्र बदललं आहे. शेकापमध्ये मोठी फूट झाली आहे. दिलीप भोईर हे शेकापमध्ये होते. ते रिंगणात असल्याने तेही शेकापचे मते खाऊ शकतात. यामुळे अलिबागमध्ये शिवसेनेच्या दळवी जिंकण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.