Mumbai Crime Saam tv
महाराष्ट्र

Mumbai Crime : सोनसाखळी चोरणारा सराईत अटकेत; दोन गुन्ह्याची उकल, १ लाखाहून अधिकचा मुद्देमाल हस्तगत

Mumbai News : दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील ५० हजार रुपये किंमतीची सोनसाखळी हिसकावून पळ काढला होता. याप्रकरणी त्रिवेणी सालियन यांनी खेरवाडी पोलीस ठाण्यात तक्रार

Rajesh Sonwane

संजय गडदे 
मुंबई
: रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातून सोनसाखळी लांबविण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. अशातच मुंबईच्या वांद्रे पूर्वेकडील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात रस्त्याने पायी चालणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळून गेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी खेरवाडी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. त्याच्या अटकेनंतर दोन गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. पोलिसांनी अटक आरोपीकडून एकूण १.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

खेरवाडी पोलिसांनी रोहित संतोष धोबी (वय २८) या संशयिताला ताब्यात घेतले आहे. दरम्यान ३० एप्रिलला रात्री साडेआठच्या सुमारास त्रिवेणी वासु सालियन या महिला चेतना कॉलेजसमोरील रस्त्यावरून जात होत्या. यावेळी दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील ५० हजार रुपये किंमतीची सोनसाखळी हिसकावून पळ काढला होता. याप्रकरणी त्रिवेणी सालियन यांनी खेरवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून खेरवाडी पोलिसांनी अज्ञाता विरोधात सोनसाखळी चोरीचा गुन्हा दाखल करून घेतला.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध 

यानंतर परिमंडळ ८ चे पोलीस उपायुक्त मनीष कलवानिया, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कविदास जांभळे यांनी गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पथके नेमली. पथकाने घटनास्थळ आणि आजुबाजूच्या परिसरातील सरकारी तसेच खाजगी सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीची ओळख पटवली. या सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे खेरवाडी पोलिसांनी रोहित धोबीला वांद्रे परिसरातून ताब्यात घेऊन चौकशी केली. 

१ लाख १५ हजाराच्या मुद्देमाल हस्तगत 

पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये त्याने चेतना कॉलेज परिसरात सोनसाखळी चोरी केल्याची कबुली दिली. याशिवाय विलेपार्ले परिसरात देखील अशाच प्रकारे एक चोरी केल्याचेही त्याने कबूल दिल्याने दोन गुन्ह्याची उखल करण्यात यश आले आहे. दरम्यान खेरवाडी पोलिसांनी आरोपीला अटक करून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, मोबाईल, चोरलेली सोनसाखळी आणि रोख रक्कम असा एकूण एक लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी लातूरमध्ये टाकला मोठा डाव, 17 अपक्ष उमेदवारांचा शिवसेनेत प्रवेश

चालत्या फिरत्या माणसाला हृदयविकाराचा झटका; अवघ्या काही सेकंदात जीव गेला

Uddhav Thackeray: भाजप हा दलालांचा उपटसुंभांचा पक्ष ; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

America Target Iran: व्हेनेझुएलानंतर अमेरिकेच्या निशाण्यावर इराण; इराणमध्ये सत्तांतर होणार ?

भाजपनं शिंदेसेनेला डिवचलं, प्रचारात '50 खोके, एकदम ओके'च्या घोषणा

SCROLL FOR NEXT