Manasvi Choudhary
डेली युजडेली युजसाठी साडी निवडताना ती वजनाला हलकी, आरामदायक आणि दिसायला स्टायलिश असणे महत्त्वाचे असते.
डेली युजसाठी साडीच्या लेटेस्ट ट्रेडिंग डिझाईन कोणत्या आहेत ते पाहूया.
खादीच्या साड्या उन्हाळ्यात थंड वाटतात . आजकाल खादीच्या साड्यामध्ये अनेक डिझाईन्स आहेत तुम्ही डेली युजसाठी या साड्या निवडू शकतात.
जर तुम्हाला सोबर आणि प्रोफेशनल लूक हवा असेल, तर लिनन साडी उत्तम आहे. या साड्या घाम शोषून घेतात आणि कॉर्पोरेट किंवा ऑफिस लूकसाठी बेस्ट आहेत.
कोटा दोरिया साडी जाळीदार असल्याने अत्यंत हवेशीर असते. उन्हाळ्याच्या लग्नसराईत किंवा पूजेत डेली वेअरसाठी बेस्ट आहे.
उन्हाळ्यात गडद रंगांऐवजी फिकट रंगाच्या फ्लोरल शिफॉन साड्या तुम्ही निवडू शकता या साड्या वजनाला हलक्या असतात.
मलमलच्या कपड्यावर हाताने विणलेली नाजूक नक्षी ही या साडीची खासियत आहे. बारीक आणि सुबक डिझाईनमुळे साडीला रॉयल लूक मिळतो.