BJP leader Nitesh Rane and MP Narayan Rane reacting after MahaYuti’s strong performance in Mumbai civic elections. Saam Tv
महाराष्ट्र

मुंबईत ठाकरेंचा पराभव होताच नारायण राणेंची पहिली प्रतिक्रिया; नितेश राणे म्हणाले, आता पाकिस्तानात जा!

Nitesh Rane Reaction On Thackeray Defeat In Mumbai: मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना धक्का बसल्यानंतर नितेश राणेंची खोचक प्रतिक्रिया तर खासदार नारायण राणेंनी महायुतीच्या विजयावर भूमिका स्पष्ट केली आहे.

Omkar Sonawane

राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकील कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी देखील बहुतांश भागात कमळ खुलले असल्याचे दिसून येत आहे. मोठा भाऊ भाजपच असे काहीसे चित्र पाहायला मिळत आहे. अशातच देशभरचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूना धक्का देत भाजपने मुसंडी मारली आहे. यावरच आता भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राणे म्हणाले, दोन्ही ठाकरे बंधूंनी संध्याकाळचे इस्लामबादचे विमान पकडावे आणि पाकिस्तानमध्ये जावे अल्लाहो अकबर म्हणार राहायचे असा खोचक टोला नितेश राणेंनी ठाकरे बंधूना लगावला आहे.

नेमके काय म्हणाले नितेश राणे?

माझा हसणारा चेहरा उद्धव ठाकरेला पाठवा, त्या सगळ्यांना माझा जय श्री राम. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण, एकनाथ शिंदे आणि महायुतीच्या सगळ्या नेत्यांच्या नेतृत्वात जय श्री रामवाला महापौर बसण्याची तयारी झाली आहे. मतदार बंधू भगिनींचे मनापासून आभार असे नितेश राणे म्हणाले. त्याचबरोबर दोन्ही ठाकरे बंधूंनी संध्याकाळची इस्लामाबादची फ्लाईट पकडावी आणि पाकिस्तानमध्य जावे. अल्लाहो अकबर म्हणत रहावे असा खोचक टोला देखील नितेश राणे यांनी लगावला आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका महायुती म्हणूनच लढणार- नारायण राणे

मुंबई आणि महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांमध्ये महायुतीने विरोधकांचा धुव्वा उडवत घवघवीत विजय मिळवला आहे. या यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अमित साटम आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांचे अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी राणे यांनी स्पष्ट केले की, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका महायुती म्हणूनच लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला असून, जिल्ह्यात पुन्हा एकदा विरोधकांचा धुव्वा उडवू असा टोला त्यांनी लगावला. जिल्हा परिषदेत 50 पैकी 50 आणि पंचायत समितीच्या 100 पैकी 100 जागा जिंकण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगत, महायुतीचा विजय निश्चित असल्याचा दावा राणे यांनी केला.

प्रचारादरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या विकासकामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विमानतळावरील वाहतूक सुरू झाली असून, महामार्ग चौपदरीकरण, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात महायुतीने विशेष लक्ष दिल्याचे राणे म्हणाले.लोकांना आम्ही केलेल्या कामांची जाणीव आहे. जिल्ह्याच्या विकासात विरोधकांचे कोणतेही योगदान नाही. त्यामुळे या जिल्ह्यात मत मागण्याचा नैतिक अधिकार आम्हालाच आहे असा घणाघाती हल्ला त्यांनी विरोधकांवर चढवला.

प्रचाराचे मुख्य मुद्दे जनतेची सेवा आणि विकास असतील, असे सांगत राणे यांनी उद्यापर्यंत जागावाटप जाहीर केले जाईल असेही स्पष्ट केले. राष्ट्रवादीकडून प्रस्ताव आल्यास त्यावर विचार केला जाईल, असे संकेतही त्यांनी दिले. महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ लवकरच करण्यात येणार असून, शंभर टक्के विजय आमचाच होईल, कारण आम्ही काम करून दाखवले आहे, असा विश्वास खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai: नवी मुंबई महापालिकेचा निकाल लागताच दोन मोठे निर्णय; बिल्डरांचे धाबे दणदणार

महाराष्ट्राच्या राजकारणात MIM ची दमदार एन्ट्री; १२० हून अधिक उमेदवार जिंकल्याचा दावा, काँग्रेसलाही पडले भारी

Celebrity Divorce: प्रसिद्ध अभिनेत्रीचा मोडला संसार; 23 महिन्यांनी घेतला काडीमोड

Maharashtra Elections Result Live Update: रवींद्र धंगेकर यांच्या मुलाचा पराभव

ऐनवेळी प्रभाग बदलला आणि अखेरच्या क्षणी ठाकरेंच्या माजी महापौराचा दणदणीत विजय|VIDEO

SCROLL FOR NEXT