राष्ट्रीय महामार्गावरील विवळवेढे उड्डाणपुलावर मोठे भगदाड पडल्याने प्रवास धोकादायक बनला आहे.
पुलावरील खड्ड्यांमधून लोखंडी गज बाहेर दिसत असून अपघाताचा धोका वाढला आहे.
काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी 15 हून अधिक वाहनांचे टायर फुटल्याच्या घटना घडल्या
वाहनधारकांनो, तुम्ही मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत आहात का? प्रवास करत असाल तर सावधान, या महामार्गावरून प्रवास करणं धोक्याचं बनलंय. राष्ट्रीय महामार्गावरील विवळवेढे उड्डाणपुलाला भले मोठे भगदाड पडले आहे. दोन दिवासापूर्वीही याच महामार्गावर पडलेल्या खड्ड्यामुळे १५ वाहनांचे नुकसान झाले होते. त्यामुळे या मार्गावरून जात असाल तर काळजी घ्या.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर असलेला विवळवेढे उड्डाणपूल सध्या मृत्यूचा सापळा बनू पाहत आहे. या पुलावर खड्डे पडले असून लोखंडी गज दिसू लागलेत. दोन दिवसांपूर्वी याच उड्डाणपुलावर जवळपास १५ पेक्षा जास्त कारचे टायर फुटून अपघात घडले होते.
मुंबई-अहमदाबाद मार्गाचे काँक्रीटीकरण करण्यासाठी तब्बल ६२० कोटी रुपयांचा खर्च आला. याआधी डांबरी रस्त्यांवर पावसाळ्यात मोठ-मोठे खड्डे पडत असल्याचे आढळून आले होते. त्यानंतर पर्याय म्हणून संपूर्ण मार्गाचेच काँक्रीटीकरण केले गेले. पण त्यानंतरही खड्डे पडण्याचे प्रकार सुरूच आहेत.
बुधवारी रात्री एक-दोन नव्हे तर १५ वाहनांना त्याचा फटका सहन करावा लागला. खड्ड्यांमुळे मुंबई-अहमदाबाद मार्ग पूर्ण खराब झालाय. आता पुन्हा या मार्गावरील विवळवेढे उड्डाणपुलावर खड्डे पडले आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाकडून कालच तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती. परंतु आज पुन्हा याच पुलावर भगदाड पडल्याने राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहेत. मागील वर्षी धानिवरी पुलावर खड्डे पडल्याने अनेक महिने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला होता. यावर्षीही पहिल्याच पावसात उड्डाणपुलांवर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.