Mumbai Agra Highway Accident Saam TV
महाराष्ट्र

Mumbai Agra Highway Accident: मुंबई-आग्रा महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात; एकाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

Mumbai Agra Highway Accident: मुंबई-आग्रा महामार्गावर ३ वाहनांचा विचित्र अपघात अपघात झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर दोन जण जखमी झाले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai Agra Highway Accident: गेल्या काही दिवसांपासून राज्यात महामार्ग अपघातात मोठी वाढ झाली आहे. दिवसागणित अपघाताच्या नवनवीन घटना कानावर येत आहे. अशीच एक घटना मुंबई-आग्रा महामार्गावर घडली आहे. धुळे शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या मुंबई-आग्रा महामार्गावर ३ वाहनांचा विचित्र अपघात अपघात झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर दोन जण जखमी झाले आहेत.

जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शनिवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-आग्रा महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकचा टायर अचानक फुटल्याने, मागून येणारा कंटेनर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि कंटेनर थेट विरुद्ध बाजूस पलटी झाला. त्यानंतर पलटी झालेल्या कंटेनरने विरुद्ध दिशेने येणाऱ्या आणखी एका ट्रकला धडक दिली.

या तीन वाहनांच्या विचित्र अपघातामध्ये कंटेनर चालक वाहनाखाली दाबल्या गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याचबरोबर या अपघातामध्ये आणखी दोन जण जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच, स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप समर्थकाची काँग्रेसच्या सभेत घुसखोरी; मोदी का बाप भी जाएगा, खरगेंचं वादग्रस्त विधान

ऑडिओ क्लिपमध्ये बोलणाऱ्यांच्या मागे बडा नेता, जरांगेंचा खळबळजनक दावा; फडणवीसांना अडकवण्याचा प्लॅन कुणाचा?

Motichoor Laduu Recipe: दिवाळीला घरच्या घरी बनवा बाजारासारखे दाणेदार आणि स्वादिष्ट मोतीचूर लाडू; वाचा सोपी रेसिपी

२० दिवस वैद्यकीय रजा अन् तेलंगणात अटक! पुण्यातील पोलीस कर्मचाऱ्याच्या कारनाम्याने खळबळ

Maharashtra News Live Update: ठाण्याहून उपनगरात जाणारी रेल्वेसेवा आता पूर्व पदावर येण्यास सुरुवात

SCROLL FOR NEXT