Motichoor Laduu Recipe: दिवाळीला घरच्या घरी बनवा बाजारासारखे दाणेदार आणि स्वादिष्ट मोतीचूर लाडू; वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य गोळा करा

मोतीचूर लाडू बनवण्यासाठी बारीक बेसन, साखर, पाणी, तूप किंवा तेल, वेलची पूड आणि आवडीनुसार केशरी फूड कलर घ्या. सजावटीसाठी पिस्त्याचे काप किंवा काजू वापरू शकता.

Motichoor Laddu Recipe | yandex

बेसनाचे मिश्रण तयार करा

एका भांड्यात बारीक बेसन घ्या. त्यात थोडे थोडे पाणी घालून गुठळ्या नसलेले पातळ मिश्रण तयार करा. मिश्रण फार घट्ट किंवा फार पातळ नसावे, जेणेकरून बारीक बुंदी तयार होईल.

Motichoor Ladoo recipe | Google

बारीक बुंदी तळून घ्या

कढईत तूप किंवा तेल गरम करा. बारीक छिद्रांच्या झाऱ्याने बेसनाचे मिश्रण गरम तेलात सोडा. तयार होणारी बुंदी जास्त कुरकुरीत होऊ न देता हलकी तळून बाहेर काढा.

Motichoor Ladoo recipe | Google

साखरेचा पाक बनवा

एका पातेल्यात साखर आणि पाणी घालून गरम करा. साखर पूर्ण विरघळल्यानंतर पाकाला थोडा चिकटपणा येऊ द्या. त्यात वेलची पूड आणि आवडीनुसार केशरी रंग घाला.

Motichoor Ladoo recipe | Google

बुंदी पाकात मिसळा

तयार बुंदी गरम साखरेच्या पाकात घालून व्यवस्थित मिसळा. बुंदीने पाक शोषून घेण्यासाठी काही मिनिटे झाकून ठेवा. मिश्रण खूप कोरडे वाटल्यास थोडासा गरम पाक घालू शकता.

Motichoor Ladoo recipe | Google

लाडूंना द्या मोतीचूरचा आकार

मिश्रण कोमट असताना हाताला थोडे तूप लावा. त्यानंतर मिश्रणाचे छोटे भाग घेऊन गोल लाडू वळा. लाडू बांधले जात नसतील, तर मिश्रणाला थोडा वेळ मुरू द्या.

Motichoor Ladoo | Google

ड्रायफ्रूट्सने सजवून सर्व्ह करा

तयार मोतीचूर लाडूंवर पिस्त्याचे काप किंवा काजू लावा. लाडू पूर्ण थंड झाल्यावर हवाबंद डब्यात साठवा. अशा प्रकारे घरच्या घरी तयार केलेले स्वादिष्ट मोतीचूर लाडू दिवाळीच्या फराळात सर्व्ह करा.

Motichoor Ladoo recipe | Google

Ghee on Empty Stomach: रोज सकाळी रिकाम्या पोटी तूप खावे का? जाणून घ्या ७ महत्त्वाच्या गोष्टी

Ghee on Empty Stomach | Saam Tv
येथे क्लिक करा