२० दिवस वैद्यकीय रजा अन् तेलंगणात अटक! पुण्यातील पोलीस कर्मचाऱ्याच्या कारनाम्याने खळबळ

Pune Police Constable Arrested With 12 Kg Ganja In Telangana: पुण्यातील विश्रामबाग वाहतूक विभागातील पोलीस कर्मचारी नितीन ज्ञानू शिंदे यांना तेलंगणातील वरंगल जिल्ह्यात १२ किलो गांजासह अटक करण्यात आली आहे.
PUNE POLICE CONSTABLE ARRESTED WITH 12 KG GANJA IN TELANGANA
PUNE POLICE CONSTABLE ARRESTED WITH 12 KG GANJA IN TELANGANAsaam tv
Published On: 

पुणे पोलीस दलाला धक्का देणारी घटना समोर आली आहे. पुण्यातील विश्रामबाग वाहतूक विभागात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला तेलंगणामध्ये १२ किलो गांजासह अटक करण्यात आली आहे. नितीन ज्ञानू शिंदे असे अटक करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नितीन शिंदे हे ७ ऑक्टोबरपासून वैद्यकीय रजेवर होते. २५ ऑक्टोबर रोजी ते तेलंगणातील वरंगल जिल्ह्यात रेल्वेने प्रवास करत होते. याचदरम्यान, अमली पदार्थांच्या तस्करीसाठी एक व्यक्ती येणार असल्याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित रेल्वेची माहिती घेत तपास सुरू केला. त्यानंतर रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या नितीन शिंदे यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे तब्बल १२ किलो गांजा आढळून आला. याप्रकरणी तेलंगणातील नेक्कोंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, शिंदे यांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पुणे शहर वाहतूक विभागाने नितीन शिंदे यांना तातडीने सेवेतून निलंबित केले आहे. शिंदे यांनी यापूर्वीही ओडिशामधून अमली पदार्थांची तस्करी केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास अधिक महत्त्वाचा ठरणार आहे.पोलिसांच्या वर्दीतील कर्मचाऱ्यावरच गांजा तस्करीचा आरोप झाल्याने पुणे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com