नीट पेपरफुटी, व्होट चोरी आणि SIR प्रक्रियेतील गोंधळानंतर काँग्रेसनं आंदोलनातून सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतलेला असतानाच आता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या एका विधानामुळे काँग्रेस अडचणीत आलीय...खरगेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल काय वादग्रस्त विधान केलं...ऐका...
मुळात काँग्रेसच्या पाटणा येथील सभेत भाजप समर्थकानं घुसखोरी करत खरगेंच्या भाषणावेळीच जोरदार घोषणाबाजी केली...त्याला इशारा देताना खरगेंनी हे विधान केलं. मात्र खरगेंच्या या विधानानंतर भाजप नेते आक्रमक झालेत.. भाजप नेत्यांनी थेट खरगेंच्या दिल्लीतील निवासस्थानी आंदोलनं केली....
दरम्यान पंतप्रधान मोदींवर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी केलेल्या आक्षेपार्ह विधानावरून राजकीय वातावरण चांगलचं तापलयं.तर खरगेंच्या भाषणावेळी भाजप समर्थकानेच मोदी नहीं जायेंगे तुम्हारा बाप जायेगा, असं विधान केलं होत असा दावा काँग्रेसनं केलाय.. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात काँग्रेस नेत्यांकडून अशाप्रकारच्या वादग्रस्त वक्तव्यांची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही काँग्रेसच्या नेत्यांकडून पंतप्रधानांवर टीका करताना वादग्रस्त विधान करण्यात आली आहेत.
7 डिसेंबर 2017
काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधान मोदींचा 'नीच' असा उल्लेख केला होता, ज्यामुळे अय्यर यांच्याविरोधात भाजप नेत्यांनी संताप व्यक्त केला
30 नोव्हेंबर 2022
गुजरात निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींची तुलना चक्क 'रावणाशी' केली होती.
21 नोव्हेंबर 2023
एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या फायनलमधील भारताच्या पराभवानंतर राहुल गांधींनी एका सभेत पंतप्रधान मोदींचा 'पनौती' असा उल्लेख केला...
15 डिसेंबर 2025
राज्यसभेत बोलताना काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी पंतप्रधान मोदींच्या कार्यपद्धतीची तुलना थेट 'हिटलरशी' केली होती.
15 डिसेंबर 2025
एका रॅलीदरम्यान काँग्रेस नेत्या मंजू मीणा यांनी 'मोदी तेरी कब्र खुदेगी' अशी आक्षेपार्ह घोषणाबाजी केली होती, ज्यावर संसदेतही सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना धारेवर धरले होते.
20 मे 2026
एका राजकीय सभेत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर टीका करताना त्यांचा 'गद्दार' असा उल्लेख केला होता, ज्यावरून भाजप आक्रमक झाली होती
निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधक दोघेही एकमेंकांवर कडाडून टीका करताना आपण अनेकदा पाहिलं असेलच...भाजपनेही अनेकदा काँग्रेस नेत्यांवर आक्षेपार्ह टीका केलीय...मात्र काँग्रेसच्या गेल्या काही दिवसातील आंदोलनानंतर देशात सत्ताधारी आणि विरोधक असा सामना रंगताना दिसतोय..अशातच सत्ताधाऱ्यांना खरगेंच्या विधानानं आयतं कोलती मिळालयं...त्यामुळे विरोधक बॅकफुटला जातात की सत्ताधाऱ्यांना शिंगावर घेतात? पाहणं महत्त्वाचं आहे...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.