Maharashtra News Live Update: ठाण्याहून उपनगरात जाणारी रेल्वेसेवा आता पूर्व पदावर येण्यास सुरुवात

Marathi Breaking Live Headlines Updates : मल्लिकाअर्जुन खरगे यांच्याविरोधात काँग्रेसचे देशभर आंदोलन, मनोज जरांगेंच्या ऑडिओ बॉम्ब, ज्ञानेश कुमार निवडणूक आयोग, हवामानाचे अपडेट, देश- विदेशातील महत्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Update
Maharashtra News Live UpdateSaam Tv News
Published On: 

लाल वादळ इगतपुरी तालुक्यातील घाटनदेवी येथे पोहोचले

आज दुपारी विविध मागण्यांसाठी निघालेला लाल वादळाचा मोर्चा इगतपुरी तालुक्यातील घाटनदेवी येथे पोहोचला आहे. आज मोर्चेकरी घाटनदेवी येथे मुक्कामी असून, उद्या सकाळी कसारा घाटमार्गे मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत.

या लाँग मार्चमध्ये वाहनांचा मोठा ताफा असून, सुमारे एक हजार वाहनांचा समावेश असल्याचा अंदाज आहे. तसेच, जवळपास चार ते पाच हजार मोर्चेकरी सहभागी झाल्याची माहिती आहे. संपूर्ण राज्यातून मोर्चेकरी घाटनदेवी येथे दाखल झाले आहेत. दरम्यान, मुक्कामाच्या ठिकाणी मोर्चेकऱ्यांच्या जेवणासाठी स्वयंपाकालाही सुरुवात करण्यात आली आहे.

ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी

मुंबईहून ठाणे रेल्वे स्थानकात येणाऱ्या लोकल मध्ये मोठी गर्दी

लोकल मध्ये चढू न दिल्याने एका रेल्वे प्रवाशाने केली डब्यातील रेल्वे प्रवाशाला मारहाण

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकवर वाहनांसाठी नवीन नियम लागू

बोगद्यांची रचना, तांत्रिक बाबी आणि प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन नागरिकांनी नियमांचे पालन करण्याचे वाहतूक शाखेचे आवाहन

येत्या १ नोव्हेंबर पासून नियमांचे पालन करण्यासाठी सूचना

कोणत्या वाहनांना या मार्गावरून प्रवास करता येणार?

खासगी कार, जीप व इतर बिगर-वाहतूक हलकी मोटार वाहने

प्रवासी बस व इतर प्रवासी वाहने यांनाही या मार्गाचा वापर करता येईल

कोणत्या वाहनांना प्रवेश बंदी?

सर्व प्रकारच्या मालवाहू वाहनांना मिसिंग लिंकवरून जाण्यास कायमस्वरूपी मनाई

पिकअप व्हॅन, टाटा एस यांसारख्या हलक्या मालवाहू वाहनांचाही समावेश

ज्वलनशील, स्फोटक किंवा इतर धोकादायक पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना सक्त मनाई

खासगी कार व इतर हलकी मोटार वाहने यांच्यासाठी १०० किमी/तास वेगमर्यादा

प्रवासी बस व प्रवासी वाहने यांच्यासाठी ८० किमी/तास मर्यादा

Mumbai: लोकलचा डबा रेल्वे कर्मचाऱ्यांनी आतून बंद केल्याने मोठा गोंधळ

ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक २ वर कल्याणकडे जाणाऱ्या धीम्या लोकलचा डबा रेल्वे कर्मचाऱ्यांनी आतून बंद केल्याने मोठा गोंधळ उडाला. प्रवाशांनी २ ते ३ मिनिटे विनवणी करूनही कर्मचाऱ्यांनी दरवाजा उघडला नाही. या मुजोरपणाचा निषेध करत संतापलेल्या एका प्रवाशाने बंद दरवाजावर पाणी फेकून तीव्र संताप व्यक्त केला. या घटनेमुळे फलाटावर काही काळ तणावाचे वातावरण होते.

राज्य मंत्रिमंडळ बैठक वादळी ठरण्याची शक्यता.

मनोज जरांगे पाटील यांनी सादर केलेली कथित ऑडिओ क्लिप चे पडसाद राज्य मंत्रिमंडळ बैठकीत उमटण्याची शक्यता

कॅबिनेट बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या कथित ऑडिओ क्लिप वर होणार चर्चा

मागील काही दिवसांमध्ये या ऑडिओ क्लिप मुळे भाजप आणि शिवसेनेचे आमदार आणि नेते आले होते आमने-सामने

शिवसेनेच्या काही नेत्यांनी थेट भाजप नेत्यांवर साधला होता निशाणा

तर भाजपच्या नेत्यांनी देखील शिवसेनेच्या नेत्यांवर केला होता पलटवार

मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले, एक ते दीड तास रेल्वे उशीराने

मुलुंड आणि कांजूरमार्ग स्थानकांदरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. लोकलसह एक्स्प्रेस गाड्यांनाही विलंब होत असून, कल्याण स्थानकात येणाऱ्या गाड्या एक ते दीड तास उशिराने धावत आहेत. त्यामुळे कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. कल्याण स्थानकात प्रवाशांची गर्दी वाढली असून, रेल्वे प्रशासनाकडून सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरुस्त करून वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

भांडुप रेल्वे स्थानकात AC लोकलच्या धडकेमुळे तरुणाचा मृत्यू

भांडुप रेल्वे स्थानकात AC लोकलच्या धडकेमुळे तरुणाचा मृत्यू

मध्य रेल्वे विस्कळीत झाल्याने घरी परतणाऱ्या प्रवाशांचे हाल

मध्य रेल्वे विस्कळीत झाल्याने घरी परतणाऱ्या प्रवाशांचे हाल

नाशिकच्या गंगापूर रोडला मिळणार नवीन समांतर रोड

- आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकला मिळणार नवीन रोड

- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते नवीन रोडचं भूमिपूजन

- नाशिकच्या गंगापूर रोडला मिळणार नवीन समांतर रोड

बदलापूर शहराला लवकरच मिळणार टाटाची वीज

बदलापूर शहराला लवकरच मिळणार टाटाची वीज

बदलापूरला लवकरच टाटा पॉवरची वीज मिळणार आहे. उपकेंद्रासोबत जुवेली ते रमेशवाडी भूमिगत केबलच्या कामाला सुरुवात जालीय. उपनगरात टाटा पॉवरची वीज मिळवणारं बदलापूर हे पहिलं शहर ठरणारंय. टाटा पॉवरमुळे बदलापूर शहराला पुढच्या काळात अखंडित वीजपुरवठा होऊन इथल्या उद्योगांनाही त्याचा मोठा लाभ होणार आहे. बदलापूरसोबत वांगणी शहरालाही टाटाची वीज दिली जाईल अशी माहिती यावेळी आ.किसन कथोरे यांनी दिली.

फडणवीसांंना महाराष्ट्राचं वाळवंट करायचं आहे का? - आदित्य ठाकरे

वृक्षतोड केल्यास आम्ही ठाण मांडूण बसू

फडणवीसांंना महाराष्ट्राचं वाळवंट करायचं आहे का?

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; चार आरोपींना २८ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील सुमित, कुणाल, राधा आणि बबिता या चारही आरोपींना न्यायालयाने २८ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मुंबई क्राइम ब्रँककडून या प्रकरणाचा तपास सुरू असून, गोळीबारामागील कथित पूर्वनियोजित कट, शस्त्रांचा पुरवठा आणि आरोपींमधील संपर्क यांचा तपास केला जात आहे. आरोपींकडून डिजिटल पुरावे आणि व्हॉइस नोट्सही हस्तगत करण्यात आल्याचा दावा तपास यंत्रणेने न्यायालयात केला आहे.

अमरावतीत खरगेंच्या वक्तव्याविरोधात भाजपचे आंदोलन; फोटोला चप्पल-बुटांनी मारले

अमरावतीच्या राजकमल चौकात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भाजपने आंदोलन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या दिवंगत वडिलांबाबत खरगेंनी केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद उमटले. भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत खरगेंच्या फोटोला चप्पल-बुटांनी मारून निषेध नोंदवला. राजकीय विरोध करताना वैयक्तिक पातळीवर जाऊन दिवंगत व्यक्तींचा अवमान करणारी भाषा वापरणे अयोग्य असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

जळगावात कौटुंबिक वादातून २१ वर्षीय तरुणाची हत्या; संशयित आरोपी अटकेत

जळगाव शहरातील छत्रपती शिवाजीनगर परिसरात कौटुंबिक वादातून धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात सनी डोळे या २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, तर अन्य दोघे जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी सुरज वानखेडे याला पोलिसांनी अटक केली आहे.

जरांगेंच्या आरोपाप्रकरणी SIT स्थापन करा - जरांगे पाटील

जरांगे पाटीलांची ऑडीओ क्लिपप्रकरणी प्रकरणी पत्रकार परिषद सुरू

१५ कोटींच्या ऑडीओ क्लिपप्रकरणी SIT

मुख्यमंत्री फडणवीसांचे मुंबई पोलिसांना आदेश

आम्ही फडणवीस साहेब आणि शिंदे साहेबांकडे अपेक्षा लाऊन बसलोय - जरांगे पाटील

वीजपंपाचा शॉक लागून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू

जुन्नर तालुक्यातील मढ पारगाव येथे शेतातील वीजपंपाचा विजेचा धक्का लागून बाप-लेकाचा मृत्यू झाला. शेतकरी राजेश देवराम चकवे (४४) आणि त्यांचा १६ वर्षीय एकुलता एक मुलगा स्मित यांच्या मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे.

मुंबईच्या गोवंडीत तरुणावर तलवार-कोयत्याने हल्ला; दोघा अल्पवयीनांसह ५ जणांना अटक

मुंबईतील गोवंडीच्या शिवाजीनगर परिसरात २३ वर्षीय नागेश नागटिळक या तरुणावर तलवार आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला. जुन्या वादातून आरोपींनी नागेशला गाठून त्याच्यावर वार करत बेदम मारहाण केली आणि घटनास्थळावरून पळ काढला. जखमी नागेशवर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले त्र्यंबकेश्वर दर्शन

त्र्यंबक नगरपालिका ताब्यात आल्यानंतर उपमुख्यमंत्री त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल; संत संमेलनानंतर मंदिरात दर्शन घेत पूजा आणि विधी संपन्न केले. यावेळी कुंभमेळ्याच्या कामांच्या तयारीची पाहणी करत नागरिकांच्या तक्रारीही ऐकून घेतल्या.

लोकशाही व्यवस्था बदनाम करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न; भाजपचे ‘लोकशाही बचाव, अराजकता हटाव’ अभियान

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेसवर लोकशाही आणि न्यायव्यवस्थेबाबत चुकीचे नरेटिव्ह पसरवल्याचा आरोप केला. न्यायालयाचा निकाल विरोधात गेल्यास न्यायव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात असल्याची टीका त्यांनी केली. सर्वोच्च न्यायालयावर आंदोलनाच्या माध्यमातून दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही गोरे यांनी केला.

भाजपने आधी स्वतःचे संस्कार तपासावेत; खरगे यांच्या विरोधातील आंदोलनावरून काँग्रेसचा सवाल 

भाजपकडून आज मल्लिकार्जुन खरगे यांच्या विरोधात आंदोलन केले जात आहे.
यावरून काँग्रेसने भाजपच्या संस्कृतीवर प्रश्न उपस्थित करत टीका केली आहे.

पुण्यात सेव्हन लव्हज चौकातील ब्रिजवर दोन चारचाकी वाहनांची धडक

पुण्यात स्वारगेटजवळील सेव्हन लव्हज चौकातील ब्रिजवर दोन चारचाकी वाहनांची एकमेकांना धडक बसून अपघात झाला. या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. काही वेळापूर्वी याच परिसरात बसने पेट घेतल्याची घटनाही घडली होती.

रस्ते बांधकामापासून वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीपर्यंत राज ठाकरेंनी उपस्थित केले प्रश्न

“ब्रिज, फ्रीवे बांधतात आणि रस्ते असे बांधतात की पुन्हा कामे निघतील. हायवेवरून जाताना लॉरी, टेम्पो आणि ट्रेलर उजव्या बाजूने जातात. त्यासाठी नियम आहेत, पण ते कोणी पाळत नाही.

माणसांची कामे कमी व्हावीत म्हणून यंत्रे आली. कॉन्स्टेबलचे काम कमी व्हावे म्हणून सिग्नलची व्यवस्था असते. पण आपल्याकडे सिग्नलही असतात आणि ट्रॅफिक हवालदारही असतात. अनेकांकडे दुचाकी आणि चारचाकी गाड्या आहेत. पूर्वी सिग्नलवर गाड्या थांबायच्या; आता दुपारी एक वाजताही गाड्या थांबत नाहीत. दुचाकीस्वारांना वाटते की सिग्नल आपल्यासाठी नाहीच.

मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुंबई महापालिका आयुक्तांना सांगितले होते. फुटपाथच्या कोपऱ्यात ‘नो पार्किंग’चे बोर्ड लावतात; ते कोणाला दिसणार?” असे राज ठाकरे म्हणाले.

वाहतूकीचा प्रश्न भविष्यात आणखी बिकट होणार – राज ठाकरे

“वाहतूकदारांचा विषय संजय नाईक, आरिफ आणि मंडळी बोलू शकतात. माझा संबंध वाहतुकीशी येतो. शहरांचा आणि वाहतुकीचा विषय मी मांडला,” असे राज ठाकरे म्हणाले.

“ई-चलनला कोणाचाही विरोध नाही; मात्र ज्या प्रकारे ई-चलन आकारले जाते, त्याची तपासणी केली पाहिजे. ई-चलन कॅमेऱ्यात नोंदवले जाते आणि नंतर ते चलन फाडले जाते. वाहतुकीचा प्रश्न खूप गंभीर आहे. भविष्यात तो आणखी आक्राळविक्राळ होणार आहे. कोणत्याही गोष्टीला बंधने किंवा चौकट घातलेली नाही. देशाचे ड्राफ्टिंग पाहिल्यावर देशाचे वर्तमान आणि भविष्य दिसते,” असेही राज ठाकरे यांनी म्हटले.

देशातील वाहतुकीचा प्रश्न गंभीर– राज ठाकरे

देशातील वाहतुकीचा प्रश्न गंभीर असून, भविष्यात तो आणखी आक्राळविक्राळ होणार असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. नियम असूनही रस्त्याच्या कडेला गाड्या लावल्या जातात. वाहतुकीवर कोणतेही बंधन नसल्याचेही त्यांनी सांगितले.

कर्जतमधील वृक्षतोडीत सहभागी होऊ नका; अविनाश जाधव यांचे आवाहन

कर्जत येथे होणाऱ्या वृक्षतोडीच्या पापात सहभागी होऊ नका, असे आवाहन मनसे नेते अविनाश जाधव यांनी केले आहे. वृक्षतोडीसाठी जव्हार आणि मोखाडा येथून जाणाऱ्या बांधवांना त्यांनी हे आवाहन केले.

“तुमच्या रोजीरोटीचा प्रश्न आम्ही सोडवू, मात्र हे पाप करू नका,” असे अविनाश जाधव म्हणाले.

अकोल्यातील एमआयडीसीत मसाला उत्पादक पेढ्यांवर छापा; 4 लाख 35 हजारांचा साठा जप्त

अकोल्यातील अन्न व औषध प्रशासनाने एमआयडीसीतील दोन मसाला उत्पादक पेढ्यांवर कारवाई केली आहे. राजकुवर ट्रेडर्स आणि टोपली अँड सन्स या दोन पेढ्यांची तपासणी करून अन्नपदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. लेबलवरील त्रुटी आणि मसाल्यांचा दर्जा निकृष्ट असल्याच्या संशयावरून उर्वरित साठा जप्त करण्यात आला. दोन्ही कारवायांमध्ये जप्त केलेल्या साठ्याची एकूण किंमत 4 लाख 35 हजार रुपये आहे.

एका पेढीला व्यवसाय बंद करण्याची नोटीस देण्यात आली, तर दुसऱ्या पेढीचा अन्न परवाना तत्काळ निलंबित करण्यात आला. अकोल्यातील कुंभारीजवळील एमआयडीसी फेज-3 परिसरात या पेढ्यांची तपासणी करण्यात आली होती.

दिल्लीतील नॉर्थ ब्लॉकजवळ आग; अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण

दिल्लीतील राष्ट्रपती भवनासमोरील नॉर्थ ब्लॉक येथे आग लागली. या इमारतीत वित्त, गृह आणि कार्मिक मंत्रालयांची जुनी कार्यालये आहेत. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती आहे. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत कागदपत्रे आणि इतर साहित्याचे नुकसान झाले नसल्याची माहिती आहे.

मल्लिकार्जुन खरगे यांच्याविरोधात मुंबईत भाजपची तक्रार; अटकेची मागणी

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याविरोधात मुंबईतील गोरेगाव पूर्व येथील वनराई पोलीस ठाण्यात भाजपकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. भाजप मुंबई कार्यकारिणी सदस्य संदीप जाधव यांच्या शिष्टमंडळाने ही तक्रार दाखल केली.

काल एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मल्लिकार्जुन खरगे यांनी केलेल्या टीकेविरोधात भाजपने ही तक्रार केली आहे. खरगे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही संदीप जाधव यांनी दिला आहे.

पुणे ब्रेकिंग- स्वारगेट चौकात बसला आग; मोठी दुर्घटना टळली

पुण्यातील स्वारगेट चौकात बसने पेट घेतला. बसमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी होते. मात्र, मोठी दुर्घटना टळली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. आग आटोक्यात आणण्यात आली. या घटनेमुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली.

मनोज जरांगे पाटील यांचा शिंदेंवर निशाणा; करिअर उद्ध्वस्त करण्याचा मोठा डाव असल्याचा आरोप

“एआय नाही, हे पळवाट शोधू शकत नाहीत. यांना काय करायचं, हेच सुचत नाही,” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “हा घाव शिवसेना पक्षावर नाही, तर त्यांच्यावरच आहे. शिंदे साहेबांचं करिअर उद्ध्वस्त करण्याचा मोठा डाव होता,” असा आरोपही त्यांनी केला.

अमरावतीच्या बडनेऱ्यात सायकल दुकानाला आग; अग्निशमन दलाच्या पहिल्या गाडीत पाणी नसल्याचा आरोप

अमरावतीच्या बडनेरा येथील जय हिंद चौकातील सायकल दुकानाला आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. अग्निशमन दलाच्या पहिल्या गाडीत पाणी नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. अग्निशमन दलाची दुसरी गाडी आल्यानंतर आग विझवून आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करण्यात आले.

राहुल गांधी यांच्या ताफ्यात अपघात; पाच गाड्या आणि रुग्णवाहिकेची धडक

राहुल गांधी यांच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांवर आदळल्याने अपघात झाला. उत्तर प्रदेशातील पूर्वांचल एक्स्प्रेसवेवर हा अपघात घडला. ताफ्यातील पाच गाड्या आणि एका रुग्णवाहिकेची एकमेकांना धडक बसली. या अपघातात राहुल गांधी पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती आहे.

दिवाळीपूर्वी बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; १०० किलो खवा जप्त

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाकडून बीडमध्ये तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत बीड शहरातील पाबळे नमकीन या फरसाण तयार करणाऱ्या कारखान्यावर कारवाई करण्यात आली. या ठिकाणी अस्वच्छता, अयोग्य साठवणूक यांसह इतर गंभीर त्रुटी आढळून आल्या. याशिवाय सोलापूर-धुळे महामार्गावरील मामा काठीयावाडी या हॉटेलमध्येही अस्वच्छता आणि इतर त्रुटी आढळल्याने हॉटेलचा परवाना रद्द करण्यात आला आहे.

दरम्यान, बीड तालुक्यातील ताडसोन्ना आणि नवापूर येथील खवा विक्री केंद्रांवर नियमांचे पालन होत नसल्याचे आढळून आल्याने दोन्ही ठिकाणांहून १०० किलो खवा जप्त करण्यात आला आहे. खव्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.

मुलुंड ते ठाणे दरम्यान रेल्वे वाहतूक उशिराने; प्रवासी ट्रॅकवर उतरले

मुलुंड स्थानकात ओव्हरहेड वायरमध्ये कपडा अडकल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुलुंड ते ठाणे दरम्यान लोकल गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहेत. रेल्वे वाहतुकीला विलंब होत असल्याने प्रवासी रेल्वे ट्रॅकवर उतरल्याचे समोर आले आहे.

रायगडमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील वाद मिटता मिटेना

कोकणातील शिवसेनेचे नेते, आमदार आणि मंत्र्यांकडून सुनील तटकरेंविरोधात तक्रारी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अनेक तक्रारी मांडल्याची सुत्रांची माहीती

“सुनील तटकरेंना तुम्हीच आवरा,” अशी नेते आणि मंत्र्यांकडून एकनाथ शिंदेंना विनवणी

गेल्या काही दिवसांपासून कोकणातील शिवसेनेचे नेते आणि सुनील तटकरे यांच्यात संघर्ष सुरू असल्याची चर्चा

कोकणातील शिवसेना नेते आणि सुनील तटकरे यांच्यातील संघर्ष अद्याप कायम

एकनाथ शिंदे तक्रारींची दखल घेऊन काय भूमिका घेणार याची चर्चा

साताऱ्यातील बामणोली येथून बोटीतून वासोटा किल्यावर जाण्यासाठी शिवप्रेमी पर्यटकांची अलोट गर्दी

विकेंडमुळे वासोटा किल्यावर जाणार्या शिवप्रेमींची अलोट गर्दी पाहियला मिळाली.बामणोली येथून वन विभागाची परवानगी घेऊन पर्यटक रवाना होतात. त्रिवेणी संगमातून पुढे बोट वासोट्याच्या पायथ्याला पोहचते.नंतर प्रवारी ट्कींग करून बाबू कडा आणि नागेश्वरी मंदीर,शिवकालीन वासोटा किल्ला पाहून निसर्गाचा अस्वाद घेऊन बोटीतून रवाना होतात.हा सिजन आॅक्टोंबर पासून तीन महिने चालतो.या वासोटा ट्रेक साठी देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो पर्यटक भेट देत असतात.

पुण्यात भरदिवसा कोयता फिरवत दहशत पसरवण्याचा प्रयत्न?

पुण्यातील ताडीवाला रोडवरील युवकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

एका युवकाने सार्वजनिक ठिकाणी कोयता फिरवत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न चर्चेत आला आहे

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, व्हायरल व्हिडिओमध्ये एक युवक हातात धारदार कोयता घेऊन तो उघडपणे फिरवताना दिसत असल्याचे सांगण्यात येत आहे मात्र हा तरुण माथेफिरू आहे का अशी सुद्धा चर्चा आहे

ऊसाला 5000 रुपये पहिली उचल द्या, अन्यथा आमदार-खासदारांना गावबंदी-

ऊस दराच्या मागणीसाठी पुन्हा एकदा सोलापूर जिल्ह्यातील ऊस दर संघर्ष समिती आक्रमक झाली आहे.

यावर्षीच्या गाळप हंगामात ऊसाला प्रति टन पाच हजार रुपये पहिली उचल जाहीर करून ती तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अन्यथा जिल्ह्यातील आमदार, खासदार व साखर कारखानदारांना गावबंदी केली जाईल, असा सडेतोड इशारा रयत क्रांती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दीपक भोसले यांनी दिला आहे.

अंबाबाई चरणी भाविकांकडून भरभरून दान

शारदीय नवरात्रोत्सवात करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या चरणी भाविकांनी भरभरून दान अर्पण केलंय... दहा दिवसांत सोनं, चांदी आणि रोख देणगीच्या माध्यमातून देवीच्या खजिन्यात एक कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा झाली आहे... यामध्ये २० लाख ३० हजार रुपयांच्या सोन्याचा, ४४ लाख ३८ हजार रुपयांच्या चांदीचा, तर ३६ लाख ७५ हजार रुपयांच्या रोख आणि ऑनलाइन देणगीचा समावेश आहे... विशेष म्हणजे, मंदिरातील मुख्य दानपेट्यांची मोजणी अद्याप बाकी आहे... त्यामुळे दानाचा अंतिम आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

रामदास कदम यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे व्यक्त केली खंत

कथित ऑडिओ किल्प संदर्भात आपल्या अनेक नेत्यांनी प्रखरतेने भूमिका मांडली नाही

ज्या पद्धतीने मी पक्षाची बाजू मांडली तशी कोणत्याही नेत्याने मांडली नाही

आपले कोण आणि त्यांचे कोण हे वेळीच ओळखलेले बरे

रामदास कदम यांनी व्यक्त केली चिंता

सूत्रांची माहिती

मावळ्यातील रिंग रोडला शेतकऱ्यांचा विरोध, गावोगावी कोपरा बैठका सुरू

सह्याद्रीच्या कुशीत वसलेला मावळ.निसर्गाची समृद्धी, सुपीक जमीन आणि शेतीच्या जोरावर उभं राहिलेलं शेतकऱ्यांचं जगणं! पण याच मावळच्या जमिनीवर आता ६५ मीटर रुंदीच्या इनर रिंग रोडचं संकट घोंगावू लागलंय.विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार असतील, तर हा विकास नेमका कुणासाठी. रस्ता वाहतुकीसाठी की शेतकऱ्यांच्या अस्तित्वावरच घाला घालण्यासाठी असा थेट सवाल आता मावळमधील शेतकरी उपस्थित करत आहेत.

दुष्काळामुळे धाराशिव जिल्ह्यातील पशुपालक शेतकऱ्यांची चारा नसल्याने मोठी अडचण

धाराशिव जिल्ह्यात पाणी टंचाईचा तर संकट आहेच,त्याच बरोबर पशुपालक शेतकऱ्यांना पुढील काळात चारा टंचाईचे ही संकट मोठ्या प्रमाणात भेडसावणार आहे. जिल्ह्यात डिसेंबर पर्यंत पुरेल इतकाच चारा शिल्लक असल्याने शेतकरी आतापासूनच शेतात मिळणारा चारा साठवून ठेवत आहे.असाच मकाचे पीक शेतकरी घेतो पण पीक निघाल्यानंतर याची मकाची कणसे बाजूला करून चीफाड फेकून देत असतो पण यावर्षी या मकावनाचेही चारा शेतकरी गोळा करून जनावराच्या चाऱ्याची तजवीज करून ठेवत आहे.आता हाय तेवढे तर जनावराला देतोय पण पुढील काळात काहीच नसणार,जनावर मरण्यापेक्षा या चाऱ्याला मिठाचे पाणी मारून हा चारा जनावराला देता येईल यासाठी ही धावपळ करत असल्याचं कळंब तालुक्यातील ईटकुर परीसरातील शेतकरी सांगत आहेत.

रेती तस्करीवर महसूल-पोलिसांचा दणका! १.२० कोटींचे सहा टिप्पर जप्त..

अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीविरोधात महसूल व पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत तब्बल १ कोटी २० लाख रुपये किमतीचे सहा टिप्पर जप्त केले आहेत. पहाटे साडेतीनच्या सुमारास सिनगाव जहागीर ते खल्याळ गव्हाण मार्गावरील धरणाच्या बुडीत क्षेत्रात ही कारवाई करण्यात आली. जाफराबाद तहसील कार्यालयाच्या महसूल पथकाला गस्तीदरम्यान नऊ टिप्पर आढळून आले. त्यानंतर जाफराबाद आणि देऊळगावराजा तहसीलदारांच्या समन्वयातून महसूल व पोलिसांनी संयुक्त तपासणी केली. यावेळी सहा टिप्पर जप्त करण्यात आले. यामध्ये एका भारतबेंझ टिप्परसह पाच विनानंबर टिप्परचा समावेश आहे. या प्रकरणी देऊळगावराजा पोलीस ठाण्यात सहा टिप्परच्या संबंधित मालकांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) आणि ६२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या या संयुक्त कारवाईमुळे अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

पोलिसांविरोधातील तक्रारींचे प्राधिकरण कधी सुरू होणार?

मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांविरोधातील तक्रारींच्या प्राधिकरणाबाबत गृह विभागाकडे माहिती मागितली आहे. हे प्राधिकरण कधी सुरू होणार आणि रिक्त पदे कधी भरली जाणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

प्राधिकरणातील अध्यक्षपदासह इतर काही पदे रिक्त आहेत. त्यामुळे प्राधिकरणाचे कामकाज पूर्ण क्षमतेने सुरू होऊ शकलेले नाही.

प्राधिकरणाची सध्याची स्थिती काय आहे आणि रिक्त पदे कधी भरली जाणार, याबाबत उच्च न्यायालयाने गृह विभागाकडून माहिती मागवली आहे.

मुंबईच्या अंधेरी पूर्वेत एमआयडीसी परिसरात धक्कादायक घटना घडली आहे

एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत महाकाली रोड परिसरात भरधाव वेगाने टँकर चालवणाऱ्या 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलाच्या मोठा अपघात

पहाटे साडेचार च्या सुमारास एमआयडीसी महाकाली रोड परिसरात हा भीषण अपघात

अपघाताच्या संपूर्ण घटना तिथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद

14 वर्षीय अल्पवयीन मुलगा पाण्याच्या टँकर चालवताना टँकर वरून त्याचा ताबा सुटला आणि थेट पहाटे 4:30 च्या सुमारास रस्त्यावर उभी असलेली कार आणि इमारतीच्या भिंतीला दिली जोरदार धडक

छत्रपती संभाजीनगर : दिवाळीपूर्वीच भेसळ करणाऱ्यांना FDA चा दणका

दिवाळीत अन्नपदार्थामधील भेसळ रोखण्यासाठी FDA ने छत्रपती संभाजीनगरमधील चिकलठाणा एमआयडीसी भागातील मसाले निर्मितीचा कारखाना, जाधववाडी मोंढ्यातील बॉम्बे ड्राय फ्रूट्स अँड मसाला, पंढरपूर येथील ओम श्रीनाथ इंडस्ट्रीज ऑईल रिपॅकिंग युनिट आणि जुना मोंढा येथील जय मिश्री ट्रेडर्स या चार मोठ्या कंपन्यांवर छापा टाकला. या कारवाईत १९ लाख ४४ हजार ९६९ रुपयांचा तेलाचा साठा तर २ लाख २७ हजार ७०० रुपयांचे मसाले आणि खोबऱ्याची पावडर असा एकूण २१ लाख ७२ हजार ६६९ रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. पथकांनी केलेल्या तपासणीत चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील एल. एम. स्पायसेस मसाला उत्पादन कारखान्यात अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे उल्लंघन करणारी धणे पावडर आणि मिरची पावडर दिसून आली. कारखान्यात बनवलेले मसाले भेसळयुक्त आणि चुकीचे ब्रँड लावले असल्याचा संशय आल्याने भेसळयुक्त मसाल्यांचा २४६ किलोचा साठा जप्त करण्यात आला. या मसाल्याची किंमत ९८ हजार ४०० रुपये असून तो संबंधित विक्रेत्याच्या सुरक्षित ताब्यात ठेवण्यात आला आहे. मसाल्यांचे नमुने चाचणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर कायद्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

भाजपकडून आज देशव्यापी आंदोलनाची हाक

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केलेल्या वक्तव्याचा करणार निषेध

पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत पाटणा येथील कार्यक्रमात खरगेंकडून वादग्रस्त टिप्पणी

देशातील सर्व राज्यांतील भाजप प्रदेश कार्यालयांबाहेर आंदोलनाची हाक

पाटणा येथील भाजप कार्यालयासमोरून आंदोलनास होणार सुरुवात

पुण्यातील मध्यवर्ती भागात दिवाळीपर्यंत अवजड वाहनांना असणार बंदी

शनिवार आणि रविवारची परवानगी देखील करण्यात आली रद्द: पुण्यातील सर्व पेठातील रस्त्यांसह प्रमुख मार्गांचा करण्यात आला यात समावेश

पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रस्ता,बाजीराव रस्ता,लक्ष्मी रस्ता यासह प्रमुख रस्त्यावर शनिवार आणि रविवारी अवजडवाहनांना असलेली वाहतुकीची परवानगी तात्पुरती रद्द करण्यात आली आहे

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती भागातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढू लागल्याने घेण्यात आला निर्णय

इम्रान खान प्रकरणात आज सुनावणी

आज अभिनेता इम्रान खान याने देश सोडून जायचे का या प्रकरणावर उच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार

अभिनेता इमरान खान सीजेपी च्या समर्थनार्थ मुंबईत पुकारलेल्या आंदोलनासाठी आला होता

यावेळी पोलिसांनी काही वेळ त्याला ताब्यात घेतले आणि सोडून दिले

मात्र त्यानंतर इम्रान खान हा भारतीय नागरिक नसून ते अमेरिकन नागरिक आहे त्यामुळे त्याने 28 ऑक्टोबर पर्यंत देश सोडून जावे अशी नोटीस मुंबई पोलिसांनी दिली होती

त्यानंतर इमरान खान यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली

या संदर्भात उच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार

Maharashtra News Live Update: नागपूर विमानतळावर महाराष्ट्र सुरक्षा बलच्या जवानाची नागरिकांना मारहाण

- विमानतळावरील आरायव्हल परिसरात उभे राहण्याच्या कारणावरून महाराष्ट्र सुरक्षा बलाचा जवान आणि काही नागरिकांत वादाला सुरवात झाली

- वाद वाढतच गेला आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानाने शिवीगाळ केल्याचा आरोप

- शिवीगाळ का केली याचा जाब विचारल्यावर महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जावनाने नागरिकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली

- मारहाण झालेल्या नागरिकांत काही ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे

- मारहाण झालेल्यांमध्ये ऑटोरिक्षा चालक असून चहा पिण्यासाठी चहा-स्टॉल वर थांबल्यावर वाद झाल्याची माहिती

- या घटनेनंतर मारहाण करणाऱ्या महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवान विरोधात सोनेगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.