dhaiwadi saam tv
महाराष्ट्र

MSRTC: आर्थिक घडी विस्कटली; दहीवडी आगारातील एस.टी. कर्मचारी राबताहेत शेतात

अन्यथा या पुढच्या काळामध्ये आत्महत्या करावी लागेल अशी भावना एसटी कर्मचारी व्यक्त करु लागले आहेत.

ओंकार कदम

सातारा : सातारा (satara) जिल्ह्यातील खटाव येथील दहीवडी (dhaiwadi) आगारातील (msrtc) चालक वाहक व वाहतूक नियंत्रक कर्मचा-यांवर शेतात काम करण्यासाठी जाण्याची वेळ आली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून संपामुळे पगार नाहीत. त्यामुळे एसटी कर्मचारी गावांमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी काम करत आहेत. (msrtc employee works in farms near dhaiwadi satara)

गेले तीन महिने झाले पगार नाही. त्यामुळे कुटुंबाची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. शासनाने त्वरित विलीनीकरणाचा निर्णय घ्यावा नाही. अन्यथा या पुढच्या काळामध्ये आत्महत्या करावी लागेल अशा तीव्र भावना सातारा (satara) जिल्ह्यातील एसटी (msrtc) कर्मचा-यांनी व्यक्त केल्या.

राज्य शासनाने (maharashtra government) कर्मचारी यांचा निलंबनाचा निर्णय घेतल्यानंतर अनेकांना धक्का बसला. काही जणांचा जीव गेला. काहींनी आत्महत्या केल्या. तरी सत्ताधा-यांनी पाझर फुटेना. आमच्या मुला बाळांचा विचार करुन शासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी या कर्मचा-यांनी केली आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kendra Trikon Rajyog: मंगळ ग्रहाने तयार केला केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' ३ राशींसाठी श्रीमंतीचा मार्ग होणार खुला

शिळी पोळी पोटात गेल्यानंतर शरीरात पाहा काय बदल होतात?

कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! 20 वर्षानंतरच घेता येणार VRS; सरकारकडून नवी गाइडलाइन जारी

Parth Pawar Pune Land Scam Case: पुण्यातील 1800 कोटींची जमीन 300 कोटीत, पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप

Face Care: नॅचरल ग्लोईंग स्किनसाठी लावा 2 मिनटात तयार होणारा 'हा' हॉममेड फेस मास्क

SCROLL FOR NEXT