msrtc will run bus from dhule to ayodhya soon sml80  saam tv
महाराष्ट्र

Dhule To Ayodhya MSRTC Bus : एसटी महामंडळाची धुळे ते अयाेध्या बस सेवा; जाणून घ्या तिकीट दर

एसटी महामंडळाने धुळ्यातून थेट अयोध्येपर्यंत सध्या एक बस सुरू केली आहे. त्यानंतर प्रतिसाद पाहून बसची संख्या वाढवली जाणार आहे अशी माहिती विभाग नियंत्रकांनी दिली.

भूषण अहिरे

Dhule News :

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (msrtc) धुळे ते अयाेध्या अशी बस सेवा (dhule to ayodhya bus service) सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सेवा येत्या दहा फेब्रुवारीपासून धुळ्यातून सुरु हाेईल. राम भक्तांना थेट अयाेध्येपर्यंत जाता येणार असल्याने भाविकांनी बस सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन धुळे एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक विजय गीते यांनी केले आहे. (Maharashtra News)

धुळेकरांना अयोध्येतील राम मंदिराचे (ram mandir ayodhya) दर्शन सहजपणे घेता यावे यासाठी एसटी महामंडळाने धुळ्यातून थेट अयोध्येपर्यंत बस सेवा सुरू करण्याचा निर्धार केला. सध्या एक बस सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रतिसाद पाहून बसची संख्या वाढवली जाईल असे गीते यांनी नमूद केले.

या बस सेवेसाठी 4 हजार 545 रुपये इतके शुल्क आहेत. ही बस दहा फेब्रुवारीला पहाटे चार वाजता धुळ्यातून निघेल. बारा फेब्रुवारीला दुपारी दोन वाजता अयोध्येत पोहचेल. त्यानंतर बारा तारखेला अयोध्यातून वाराणसीला जाईल. वाराणसी (varanasi) येथे प्रयागराज मुक्कामी असेल. त्यानंतर पुन्हा सकाळी धुळ्याकडे बस प्रस्थान करेल. या प्रवासादरम्यान दोन चालक बस सोबत असतील असेही गितीने स्पष्ट केले.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : स्कूल बसचा भीषण अपघात, झाडाला धडक दिल्यानंतर...; २२ विद्यार्थी जखमी

Maharashtra Live News Update: दहिसर टोल नाका शिफ्ट करण्याचा सरकारचा निर्णय - प्रताप सरनाईक

Indurikar Maharaj Age: प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज याचं वय किती? माहितीये का?

DNAचे जनक शास्त्रज्ञ जेम्स वॉटसन यांचं निधन; ९७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Gold Price Today: आठवड्याच्या शेवटी सोन्याच्या दरात घसरण, खरेदीची सुवर्णसंधी; वाचा १८- २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

SCROLL FOR NEXT