Vinayak Raut, Narayan Rane  saam tv
महाराष्ट्र

Vinayak Raut News : त्यांच्या गमजा, लाचारी, भाजपनं केवळ भुंकण्यासाठी पाळलं; राणेंचा बाजार उठवणार : विनायक राऊत

बारसूतील लाेकांच्या आम्ही पाठीशी असल्याचे खासदार राऊत यांनी स्पष्ट केले.

Siddharth Latkar

- विनायक वंजारे

Vinayak Raut News : बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन (barsu refinery) काेकणात राजकीय (kokna politics) घमासन सुरु आहे. आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा एका खासदार विनायक राऊत (vinayak raut) यांनी राणे पितापुत्रावर निशाणा साधला. रिफायनरीच्या विराेधात असणा-या पाच गावात नारायण राणेंनी (narayan rane) पाय ठेवून दाखवावे असे आव्हान खासदार विनायक राऊत यांनी दिले आहे. (Maharashtra News)

खासदार विनायक राऊत म्हणाले नारायण राणेंनी स्वतःचा इतिहास आठवावा. त्यांनी थाेडं भूतकाळात जायला हवं. रिफायनरी विरोधात तेव्हा केवढ्या गमजा मारल्या होत्या, केवढे मोठे मोर्चे काढले होते. पण राणे आत्ता सत्तेच्या लाचारीसाठी केवळ रिफायनरीचे समर्थन करीत आहेत.

नारायण राणेंच्यात हिंमत असेल तर त्यांनी रिफायनरीला विराेध होत असलेल्या पाच गावात पाय ठेवून दाखवावा असे खूलं आव्हान विनायक राऊत यांनी दिले आहे.

खासदार विनायक राऊत यांनी नितेश राणे यांच्यावर देखील टीका केली. ते म्हणाले नितेश राणेंना राजकारणातली अक्कलदाढ अजून यायची आहे. नितेश राणेंना फक्त उद्धव ठाकरेंवर व उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवर भुंकण्यासाठी भाजपने पाळल आहे. दरम्यान येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत नितेश राणेंचा बाजार उठवणार असा इशारा देखील राणेंना खासदार विनायक राऊत यांनी दिला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rangoli Tips: दारासमोर काढलेली रांगोळी फेकून देऊ नका, असा करा वापर, भांडी होतील झटक्यात चकाचक

Maharashtra Live News Update : निवडणूक आयोगाच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी मोर्चा काढणार - बाळा नांदगावकर

Viral Resignation Letter : "टार्गेट वाढतं, पण पगार नाही..." कंपनीला वैतागून घेतला तडकाफडकी निर्णय, सोशल मीडियावर राजीनामा व्हायरल

३० हजार पगार, २० हजार भाडं; मोठी शहरं.. मध्यमवर्गीयांनी जगावं तरी कसं? विश्लेषकाची पोस्ट व्हायरल

Sangram Jagtap: हिंदूंच्या दुकानात 'लादेन आणि सद्दाम'चे फटाके कसे? अजित पवारांच्या आमदाराचा सवाल|VIDEO

SCROLL FOR NEXT