Vinayak Raut, Narayan Rane, Barsu Refinery, Nitesh Rane, Uddhav Thackeray, Nilesh Rane. saam tv
महाराष्ट्र

Vinayak Raut On Uddhav Thackeray Barsu Visit : उद्धव ठाकरेंच्या बारसू दाै-यात काळी मांजरं आडवी टाकण्याचा भाजपचा प्रयत्न, विनायक राऊतांनी नारायण राणेंना 'झंझावत' ची करुन दिली आठवण

सहा तारखेला बारसूत प्रकल्पाच्या विराेधातले लाेक एकवटणार आहेत.

Siddharth Latkar

- विनायक वंजारे

Vinayak Raut News : बारसू प्रकल्पाला (barsu refinery) विरोध करणाऱ्या हजारो ग्रामस्थांना भेटण्यासाठी आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे बारसूत (uddhav thackeray barsu visit) येत आहेत. ते आल्यानंतर रिफायनरी विरोधकांची ताकद किती आहे हे सर्वांनाच दिसेल. त्यामुळेच भाजपाने (bjp) काळी मांजरे आडवी टाकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे अशी टीका खासदार विनायक राऊत (mp vinayak raut) यांनी केली. (Maharashtra News)

खासदार विनायक राऊत म्हणाले येत्या सहा मे राेजी सकाळी दहा वाजता उद्धव ठाकरे हे मुंबईहून बारसूला येण्यासाठी प्रयाण करतील. या दाै-यामुळे भाजपमध्ये चलबिचल झाली आहे. काल (बुधवार) माजी खासदार निलेश राणे यांनी बारसूत घातपाताची शक्यता वर्तवली आहे. राणेंनी जे भयानक व स्फोटक वक्तव्य केले आहे.

त्याची पोलिसांनी तातडीने दखल घेऊन निलेश राणे यांची कसून चौकशी करावी. त्या स्फोटकांमध्ये भाजपा आणि निलेश राणेंचा हात आहे का हे तपासून पाहावं अशी मागणी खासदार विनायक राऊत यांनी केली आहे.

दरम्यान केंद्रीयमंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे, निलेश राणे, उदय सामंत, देवेंद्र फडणवीस हे बारसू रिफायनरीची दलाली घेऊन काम करत असल्याचा घणाघात खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.

उद्याेगमंत्री उदय सामंत यांच्यात बारसूत जाऊन स्थानिकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्याची हिम्मच नसल्याचे खासदार राऊत यांनी म्हटलं. पाेलिसांच्या बळावर स्थानिकांचे आंदाेलन माेडीत काढण्याचा डाव सामंत आणि त्यांचे सरकार करीत असल्याचे राऊत यांनी नमूद केले.

नारायण राणेंचा झंझावत वाचलात का ?

मंत्री नारायण राणे यांच्या झंझावत या आत्मचरित्रात रिफायनरीला राणेंनी विराेध केल्याचे खासदार राऊत यांनी म्हटलं. ते म्हणाले माझा राजकीय पाठींबा काेणालाही असाे. पण नाणार प्रकल्प (आता बारसू) या विनाशकारी प्रकल्पास माझा विराेध आहे अशी भूमिका राणेंनी नमूद केली आहे. यामुळे हजाराे शेतकरी, मच्छीमार हे बाधित हाेणार आहेत असेही लिहिल्याचे राऊत यांनी सांगितले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Luckiest zodiac signs: आज कोणाच्या जीवनात येणार शुभवार्ता? पंचांग आणि ग्रहयोग देतायत मोठं संकेत!

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

Sleep Health: अचानक चिडचिड वाढतेय आणि स्क्रिन टाईमपण वाढलाय? ८ वर्षांच्या संशोधनात समोर आलं धक्कादायक कारण

Mumbai Crime: मुंबई हादरली! बर्थडे सेलिब्रेशनवेळी ५ मित्रांनी तरुणाला पेट्रोल टाकून पेटवलं, थरकाप उडवणारा VIDEO

Education Department Scam : शिक्षण विभागात खळबळ! तब्बल १ लाखांची लाच घेताना बड्या अधिकार्‍याला रंगहाथ पकडले

SCROLL FOR NEXT