omraje nimbalkar on tuljapur drug racket  Saam tv
महाराष्ट्र

लांडग्याच्या हाती कोकराचे रक्षण; तुळजापूर ड्रग्ज रॅकेट प्रकरणी खासदार निंबाळकर आक्रमक, मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

omraje nimbalkar on tuljapur drug racket : तुळजापूर ड्रग्ज रॅकेट प्रकरणात खासदार निंबाळकर आक्रमक भूमिका घेतलीये. त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी केली आहे.

Vishal Gangurde

धाराशिव - तुळजापुरातील ड्रग्ज रॅकेट प्रकरणात पोलिसांची कारवाई केवळ दिखाऊ असून मुख्य सूत्रधार मोकाट असल्याचा आरोप धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केला. त्यानंतर खासदार निंबाळकार यांनी या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट पत्र लिहिलंय. या पत्रात वादग्रस्त पोलीस उपअधीक्षक निलेश देशमुख यांना दिलेल्या मुदतवाढीवर तीव्र आक्षेप नोंदवला. त्यानंतर त्यांची तातडीने बदलीची मागणी निंबाळकर यांनी केली आहे.

निंबाळकर यांनी मुख्यमंत्र्यांना ९ सप्टेंबर रोजी निवेदन पाठवलं. या निवेदनात यांनी म्हटलं की, तुळजापूरमधील ड्रग्ज रॅकेटमधील अनेक आरोपींना जामीन मिळाला आहे. तरीही त्यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. या आरोपींपैकी एका व्यक्तीचा मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर सत्कार केल्याचंही उघड केलंय'.

निंबाळकर यांनी पुढे म्हटलं की, तुळजापुरात ड्रग्जचा सुळसुळाट ज्या अधिकाऱ्याच्या कार्यकाळात झालाय. त्याच डीवायएसपी निलेश देशमुख यांना बदली न करता एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आलीये. ज्यांच्या कार्यक्षमतेवर गंभीर शंका आहे. त्यांना बक्षीस दिले जात आहेत. सरकारची ही बाब नीयतवर प्रश्नचिन्ह निर्माण करते. या अधिकाऱ्याकडेच तपास ठेवणे म्हणजे लांडग्याच्या हाती कोकराचे रक्षण देण्यासारखं आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळातील कारभारावर विश्वास ठेवता येत नाही'.

निबांळकरांनी मुख्यमंत्र्यांकडे काय मागण्या केल्या?

निबांळकरांनी मुख्यमंत्र्यांना केलेल्या मागणीत म्हटलं की, 'ड्रग्ज रॅकेटमधील सर्व मुख्य आरोपींना तातडीने अटक करावी. त्यानंतर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई करावी. आरोपीचा सत्कार करणाऱ्या मंत्र्यांविरोधात कारवाई करण्यात यावी. डीवायएसपी निलेश देशमुख यांना दिलेली मुदतवाढ तातडीने रद्द करावी. त्यानंतर त्यांची बदली करावी. संपूर्ण प्रकरणाचा तपास स्वतंत्र आणि उच्चस्तरीय यंत्रणेकडे सोपवावा'. राजकीय भेद विसरून या प्रकरणात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी स्पष्ट मागणी खासदार ओमराजे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HBD Hema Malini : धर्मेंद्र की हेमा मालिनी सर्वात जास्त श्रीमंत कोण? पाहा 'ड्रीम गर्ल'च्या संपत्तीचा आकडा

पुन्हा अग्नितांडव! अलिशान गाडीला ट्रेलर धडकला, आगीत ४ मित्र जिवंत जळाले

Maharashtra Live News Update : पुण्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी

Maharashtra Infrastructure: उत्तर महाराष्ट्रासाठी खूशखबर! नव्या रेल्वे मार्गाचे कामाला सुरूवात, ४ जिल्ह्यांना होणार फायदाच फायदा

Maharashtra Politics: मोठी बातमी! शिंदेसेनेचा स्वबळाचा नारा, निवडणुकीसाठी स्वतंत्र मोर्चेबांधणी

SCROLL FOR NEXT