युद्धाचा भडका, देशावर तेल संकट? गॅसच्या किंमती गगनाला भिडणार?

Iran America Conflict: अमेरिकेनं इराणवर केलेल्या हल्ल्याचा बदला घेत इराणने अख्ख्या जगाची नाकेबंदी केलीय...मात्र इराण अमेरिका युद्ध आपल्या दारापर्यंत आलंय... या युद्धाच्या आगीत भारतीयांचीही होरपळ होण्याची शक्यता आहे...
Massive fire erupts at an oil depot in the Middle East following escalating tensions between Iran and the United States, raising fears of a global fuel crisis.
Massive fire erupts at an oil depot in the Middle East following escalating tensions between Iran and the United States, raising fears of a global fuel crisis.Saam Tv
Published On

अमेरिका आणि इस्त्रायलला आलेली युद्धाची खुमखुमी इराणने जिरवायला सुरुवात केलीय... आधी सौदी अरेबिया, युएई, कतार, कुवैत, बहरीन, इराक, ओमान, जॉर्डन आणि इराकमधील अमेरिकेचे लष्करी तळ उद्ध्वस्त केले.. इराण एवढ्यावरच थांबला नाही... तर त्याने आखाती देशातील तेल उत्पादक कंपन्यानाही लक्ष्य केलय...

हा धडकी भरवणारा व्हिडीओ आहे कुवैतमधील... इराणने कुवैतमधील तेल डेपोवर ड्रोन हल्ला केलाय.. फक्त कुवैतच नाही तर दुबई, सौदी अरेबिया, इराकमधील तेल डेपोही लक्ष्य करण्यात आलेत... यात जगाचं टेन्शन वाढवणारी गोष्ट म्हणजे इराणने जगातील सर्वात मोठ्या नैसर्गिक गॅस पुरवठ्याच्या प्रकल्पांवरही भीषण हल्ले केलेत... त्यामुळे कतारने एलएनजीचं उत्पादन बंद केलंय... एका बाजूला खनिज तेलांच्या प्रकल्पांवर हल्ले तर दुसरीकडे इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यानं युद्धामुळे भारताचीही होरपळ सुरु झालीय... ती नेमकी कशी? पाहूयात...

होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यानं 50 टक्के खनिज तेल आणि 54 टक्के नैसर्गिक गॅसचा पुरवठा ठप्प होण्याची शक्यता आहे... भारताला 2 कोटी 70 लाख टन एलएनजीची गरज आहे.. त्यापैकी 40 टक्के एलएनजी कतारकडून आयात केला जातो...मात्र हा गॅस पुरवठा ठप्प झाल्याने गॅस पुरवठ्यात 60 टक्क्यापर्यंत घट झालीय... त्यामुळे गॅसच्या किंमती दुप्पट होण्याची शक्यता आहे... तर ब्रेंट क्रुड ऑईलही 120 डॉलर प्रति बॅरलवर जाण्याची शक्यता आहे... त्यामुळे देशात महागाई वाढण्याची भीती व्यक्त केली जातेय..

एका बाजूला इराणने जगाची नाकेबंदी केली असताना रशियानेही मोठा डाव साधलाय... अमेरिकेचं ऐकून रशियन तेलावर निर्बंध लादणाऱ्या युरोपियन देशांना गॅस पुरवठा करणार नसल्याची इशाराच पुतीन यांनी दिलाय.. खरंतर इराण आणि भारत अनेक वर्षांचे राजनैतिक मित्रदेश....मात्र इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या हत्येनंतरही भारतानं मौन बाळगलं... त्यामुळे होर्मुझ सामुद्रधुनीचा मार्ग रोखून धरुन इराण भारताचा बदला घेणार का? इंधनाचे दर भडकून देशात महागाईचा आगडोंब उसळणार का? याचीच भीती व्यक्त केली जातेय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com