
अपोलो मायक्रो सिस्टीम्सने दिला ६ महिन्यांत १४०% परतावा
५ वर्षांत या शेअरने दिला २३२३% परतावा
कंपनी डिफेन्स सिस्टीम्ससाठी इलेक्ट्रॉनिक, सॉफ्टवेअर उत्पादने तयार करते
विश्लेषकांच्या मतानुसार स्थिर परफॉर्मन्समुळे शेअर ₹३१५ पर्यंत जाऊ शकतो
शेअर बाजारात मल्टिबॅगर स्टॉक्सची मोठी यादी आहे. या यादीमधील मोजके शेअर वेळेत चांगला परतावा देतात. त्यात डिफेन्स क्षेत्रातील कंपनी अपोलो मायक्रो सिस्टमच्या शेअरने सहा महिन्यात दुप्पट परतावा दिला आहे. तर पाच वर्षांत या शेअरने २००० टक्क्यांहून अधिक परतावा दिल्याने गुंतवणूकदारांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळतोय.
'आज तक'च्या रिपोर्टनुसार, अपोलो मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रोमॅकेनिकल सिस्टमचा पुरवठा करणारी कंपनी आहे. यात मिसाइल प्रोग्राम्स, अंडरवॉटर मिसाइल प्रोग्राम्स, एवियोनिक सिस्टम, पनडुब्बी सिस्टमचा वापर करणारी प्रोडक्ट्सची डिझाइन, डेव्हलपमेंट, डिस्ट्रीब्यूशनचा समावेश आहे. डिफेन्स शेअर मंगळवारी २७५.२५ रुपयांपासून सुरु झाल्यानंतर उसळी घेऊन २९०.८० रुपयांवर पोहोचला.
अपोलो मायक्रो सिस्टमचे शेअरने फक्त सहा महिन्यात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. या काळात गुंतवणूकदारांना १४०.२५ टक्के परतावा दिला आहे. प्रत्येक शेअरची किंमत १६३ रुपयांनी वाढली आहे. १० मार्च रोजी अपोलो मायक्रो सिस्टम्सच्या शेअरची किंमत ११६.९० रुपये होती. तर काल मंगळवारी या शेअरची किंमत ही २९०.८० रुपयांवर पोहोचली आहे. या शेअरची ५२ आठवड्यांची उच्चांक पातळी ३२१ रुपयांवर पोहोचली आहे.
डिफेन्स स्टॉक पाच वर्षांत गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरला आहे. या स्टॉकची किंमत ११ रुपयांहून २९० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. या शेअरने गुंतवणूकदारांना २३२३.७८ टक्के इतका परतावा दिला आहे. या शेअरमध्ये गुंतवणूकदाराने १ लाखांची गुंतवणूक केली असेल, तर त्याची पाच वर्षांनी रक्कम २४,२३,००० रुपयांवर पोहोचली असती.
पाच वर्ष आणि सहा महिन्यात नव्हे तर एक वर्षांत एका शेअरने १७२ टक्के परतावा देखील दिला आहे. एसएमबी ग्लोबल सिक्योरिटीजचे सिनिअर रिसर्च अॅनालिस्ट क्षितीज गांधी यांच्या माहितीनुसार, आठवडाभरात या शेअरने चांगली कामगिरी केली आहे. या शेअरमध्ये स्थिरता देखील दिसून येत आहे. त्यामुळे हा शेअर ३१५ रुपयांपर्यंत जाऊ शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.