Dharashiv : ST प्रवाशांचा जीव धोक्यात; महामंडळाच्या प्रमुख अधिकाऱ्यांकडूनच विभागाचा कारभार उघड

Dharashiv st bus service : धाराशिवात ST प्रवाशांच्या जीवाशी खेळ होत असल्याचं समोर आलंय. या एसटी महामंडळाचे प्रमुख अधिकारी उल्हास शिंगारे यांनी या विभागाचा कारभार उघड केला आहे.
Dharashiv st bus
Dharashiv st bus service Saam tv
Published On
Summary

धाराशिव जिल्ह्यात खराब अवस्थेतील एसटी गाड्या प्रवाशांच्या जीवाशी खेळ

भूम ते बोरिवली या मार्गावर तांत्रिक दोष असलेल्या गाड्या

चालकांकडून तक्रार करूनही एसटी महामंडळाकडून दुर्लक्ष

एसटी अधिकाऱ्यांनी बेजबाबदार विधान करून प्रवाशांच्या सुरक्षेची खिल्ली

धाराशिव : जिल्ह्यातील भूम तालुक्यात एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर बेजबाबदारपणा होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे. गाड्यांची दुरवस्था असतानाही लांब पल्ल्याच्या मार्गांवर धाडल्या जात असल्याचे निर्दशनास येत आहे. गाड्यांची दुरवस्था झालेल्या एसटी वाहनाच्या अपघाताच्याही घटना घडल्या आहेत. त्यामुळे विभागाकडून प्रवाशांच्या जीवाशी खेळ होत असल्याचे उघड होत आहे.

विशेषतः भूम ते बोरिवली या लांब अंतराच्या मार्गावर, अत्यंत जर्जर, तांत्रिक दोषांनी भरलेल्या एसटी बस नियमितपणे सोडल्या जात आहेत. ब्रेक फेल होणे, लाईट न लागणे, यांसारख्या मूलभूत यंत्रणाही या एसटी गाड्यांचे नीट कार्यरत नाहीत. त्यामुळे गाड्यांची वाईट अवस्था समोर येत आहे.

Dharashiv st bus
OBC Reservation : मराठ्यांचं कुणबी प्रमाणपत्र रद्द होणार? वकील योगेश केदार यांनी सांगितली अडचण, आता नवी मागणी चर्चेत

स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भूम आगारातील काही चालकांनीही ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास वारंवार आणून दिली. मात्र यावर कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याची तक्रार आहे. परंतु नवीन आलेल्या गाड्या स्थानिक भागासाठी वापरण्यात येत आहेत.

या प्रकरणी संपर्क साधला असता, एसटी महामंडळाचे प्रमुख अधिकारी उल्हास शिंगारे यांनी सांगितले की, गाडीचा खर्च जास्त आहे. त्यातून उत्पादन येत नाही. त्यामुळे आम्ही अशाच प्रकारच्या गाड्या देणार. तुम्हाला काय करायचे ते करा. आम्ही आमची मनमानी करू. अशा पद्धतीने उत्तर देण्यात आले'.

Dharashiv st bus
Job Recruitment : एअरपोर्ट अ‍ॅथोरिटी ऑफ इंडियात ९०० हून अधिक पदासाठी भरती; कुठे अन् कसा कराल अर्ज?

प्रवाशांच्या मते, हे कारण पुरेसे समाधानकारक नाही. सार्वजनिक वाहतूक ही लाखो नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. अशा स्थितीत, वाईट अवस्था झालेल्या बसने प्रवास करणे म्हणजे अपघाताला आमंत्रण देण्यासारखे आहे. स्थानीय प्रशासन, एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी आणि परिवहन मंत्रालय यांनी या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन सुरक्षित, नीटनेटकी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देणार का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com