Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

Maharashtra Political News : दसऱ्यानंतर राज्यात पुन्हा एकदा मोठा भूकंप होणार आहे..मात्र कोणत्या पक्षाचे किती आमदार फुटणार? शिंदेसेनेच्या आमदारांनं राज्याच्या राजकारणाबद्दल नेमका काय दावा केलाय? पाहूयात... या स्पेशल रिपोर्टमधून...
uddhav thackeray News
uddhav thackeray Saam tv
Published On

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका तोंडावर आल्या असताना राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंपाची चर्चा रंगलीय.. त्याला कारण ठरलंय आधी खासदार आणि आता विधानपरिषद आमदार असलेले शिंदे सेनेचे आमदार कृपाल तुमाने यांनी केलेला खळबळजनक दावा.. दसऱ्यानंतर राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार असून त्याचा हादरा मातोश्रीला बसणार असल्याचं तुमानेंनी म्हटलंय..

uddhav thackeray News
Nepal Protest : गृहमंत्री, पंतप्रधानांचा राजीनामा; नेपाळमध्ये सत्तापालट घडवून आणणारा ३६ वर्षीय तरुण कोण?

दुसरीकडे पैसा, दहशत आणि ईडीपुढे जे शरण गेले त्यांनी निष्ठावंतांवर बोलू नये, अशा शब्दात संजय राऊतांनी तुमानेंचा खरपूस समाचार घेतलाय.

खरं तर 2022 मध्ये विधानपरिषद निवडणुकीनंतर शिवसेनेत उभी फूट पडली आणि उद्धव ठाकरेंचं सरकार पडलं... त्यानंतर ठाकरे सेनेच्या अनेक आमदार, खासदारांनी शिंदेसेनेत प्रवेश केलाय.आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा ठाकरे सेनेतील 20 पैकी 18 आमदार राऊतांवर नाराज असल्याने शिंदेसेनेत प्रवेश करण्याचा दावा केला जातोय.

uddhav thackeray News
TET : राज्यातील लाखो शिक्षकांचा पगार अडकणार, वेतन अधीक्षकांचे शाळांना महत्वाचे आदेश; ‘टीईटी’ संदर्भातील नवीन अपडेट काय?

त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत प्रतिकूल परिस्थितीतही ठाकरेंना साथ देणारे आमदार आता खरंच ठाकरेंची साथ सोडणार की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निकराने लढवून विजयाचा गुलाल उधळणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com